712 | विशिष्ट यंत्रणेमुळे साधा ट्रॅक्टरही होणार स्वयंचलित
एबीपी माझा वेब टीम Updated at: 15 Sep 2018 08:27 AM (IST)
नांगरणी, पेरणी, फवारणी अशी कामं करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र हे ट्रॅक्टर चालवण्यासाठी मजुराची गरज लागते. काही शेतकरी ट्रॅक्टरचाही वापर करत नाही. तेव्हा त्यांना पूर्णपणे मजुरांवर अवलंबून राहावं लागतं. आणि सध्या शेतकऱ्यांना मजूर टंचाईला सामोरं जावं लागतंय. अशा वेळी मजुरांशिवाय फक्त स्मार्टफोन वरुन ट्रॅक्टर चालवता आला तर? हे शक्य आहे..कसं?पाहुया...