712 | केंद्राकडून साखर उद्योगाला 4,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 09:18 AM (IST)
साखर उद्योगासाठी केंद्र सरकारनं ४,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. यामध्ये साखर काऱखान्यांना साखरेच्य़ा निर्यातीमध्ये दिलं जाणारं अनुदानही अंतर्भूत असणारेय. साखर कारखान्यांना जवळपास ५० लाख टन साखर निर्यात करणं बंधनकारक करण्यात आलंय. याआधी सरकारनं जूनमध्ये ८,५०० कोटींचा निधी मंजूर केला होता. असा एकूण १३००० कोटींचा निधी साखऱ उद्योगाला देण्यात आलाय. समुद्र किनारा लाभलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना वाहतुकीच्या खर्चातही मदत दिली जाणारेय. बंदरापासून १०० किमी अंतरावर असलेल्या कारखान्यांना १००० रुपये प्रति टन. तर १०० किमीपेक्षा दूर असणाऱ्या कारखान्यांना २५०० रुपये प्रति टन आणि किनारी भागापासून दूर असलेल्या कारखान्यांना ३००० रुपये प्रति टन निधी देण्य़ात येणार आहे.