मुंबई : कोणत्याही व्यक्तीला गाडी (Car) किंवा दुचाकी (Bike) चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आवश्यक आहे. भारतीय मोटार वाहन कायद्याच्या (Indian Motor Vehicle Act) नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License Rules) मिळविण्यासाठी कायदेशीर वय 18 वर्षे आहे. पण 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते, हे तुम्हाला माहित आहे का? भारतीय मोटार वाहन कायद्यांतर्गत काही तरतुदी अंतर्गत तुम्ही 16 व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार, कोणत्या निकषा अंतर्गत 16 वर्षे वयाच्या लोकांनाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या.


वयाच्या 16 व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते


भारतात जर एखाद्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 वर्षे वय पूर्ण असणारी व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करु शकते. लायसन्स मिळवण्यासाठी आधी शिकाऊ परवाना बनवला जातो. त्यामुळे स्कूटरसारखी गेअरलेस वाहने (Gearless vehicles) चालवता येतात. शिकाऊ परवाना जारी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत अपडेट करणे आवश्यक आहे.


निकष काय?


पण तुम्ही मोटार वाहन कायदा 1988 च्या कायद्यानुसार (Indian Motor Vehicle Act), वयाच्या 16 व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवू शकता. यासाठी दिलेल्या काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. जर हे लायसन्स (Driving License) शिकाऊ लायसन्ससारखंच (Learning Driving License) आहे. हा परवाना घेतल्यानंतर तुम्ही विशिष्ट प्रकारचे वाहनच चालवू शकता.


50 सीसीपेक्षा कमी बाईक चालवू शकता


16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढायचं असेल, तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) भारताच्या मोटार वाहन कायद्यानुसार (Indian Motor Vehicle Act) बनविला जातो. पण हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर, ती व्यक्ती फक्त 50 सीसी किंवा त्यापेक्षा कमी बाईक चालवू शकते.


हे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) असलेल्या व्यक्ती कोणतेही वाहन चालवू शकत नाही, फक्त 50 सीसीपेक्षा कमी बाईक चालवता येतात. त्यासाठी त्याला 18 वर्षांचा झाल्यानंतर हे लायसन्स (Driving License) तुम्हाला अपडेट (Update) करावं लागेल. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया (Driving License Process) सामान्य ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारखीच आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ना आधार, ना वोटर आयडी; केवळ जन्म दाखल्यानंच झटपट होणार कोणतंही काम, 1 ऑक्टोरपासून नवा नियम