Year Ender 2023 : यंदा बजेट स्मार्टफोनमध्ये कंपन्यांनी कर्व्ह्ड डिस्प्ले, डिझाइन, 5G कनेक्टिव्हिटीसह अनेक उत्तम फीचर्सही दिले. आम्ही तुम्हाला (Year Ender 2023) या वर्षातील 5 बेस्ट बजेट (Smartphones) स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही आता स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये वनप्लस, मोटोरोला, इनफिनिक्स आदी फोनचा समावेश आहे. नवीन वर्ष येण्यापूर्वी हे फोन तुम्ही स्वस्त्यात खरेदी करु शकता आणि मोठा डिस्काऊंटपण मिळवू शकता.
बेस्ट बजेट स्मार्टफोन
Lava Agni 2 5G: या फोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले, कर्व्ड ग्लास बॅक पॅनेल, 67 वॉट फास्ट चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, मीडियाटेक डायमेंसिटी 7050 6nm प्रोसेसर आणि क्वाड कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. उत्तम फीचर्स देणारा हा या वर्षातील बेस्ट बजेट फोनपैकी एक आहे. सध्या अॅमेझॉनवरून याला 19 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे.
Infinix GT 10 Pro: या स्मार्टफोनला कंपनीने गेमिंग फोन म्हणून टीज केले होते. यात मीडियाटेक चिप आहे जी सर्व गेम सहजपणे हाताळते. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये डिमेसिटी 8050 प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. सध्या या मोबाइलफोनची किंमत 21,999 रुपये आहे.
Samsung Galaxy M34: या स्मार्टफोनमध्ये लावा आणि इनफिनिक्स सारखे स्पेक्स नसले तरी बॅटरी लाइफमध्ये हा फोन आघाडीवर आहे. यात 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी जड वापरातही एक दिवस चालू शकते. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 6 आणि 8 जीबी रॅम चा पर्याय आहे. सध्या या स्मार्टफोनची किंमत 18,499 रुपये आहे.
Moto G84: हा कमी बजेटमधील हाय परफॉर्मन्स स्मार्टफोन आहे. सध्या याची किंमत 18,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 12 जीबी रॅम आहे. मोबाइल फोनचे डिझाइन लेदर फिनिशसह येते जे प्रीमियम लुक देते.
OnePlus Nord CE 3 Lite : या वर्षी या स्मार्टफोनची चांगली विक्री झाली आहे. फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी चिप, 67 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 एमएएच बॅटरी आणि 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह 6.72 इंचाचा डिस्प्ले आहे. सध्या या फोनवर 1000 रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर