शाओमीची स्पेशल ऑफर, फक्त १ रुपयात खरेदी स्मार्टफोन
तर या सेलच्या शेवटच्या दिवशी 10 शाओमी mi max आणि 100 mi ब्लूटूथ स्पीकर देण्यात आला आहे.
या रजिस्ट्रेशची माहिती कंपनीने शाओमीने आपल्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून दिली आहे.
21 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी 10 शाओमी रेडमी नोट 3 आणि 10 mi बँड डील अंतर्गत उपलब्ध आहे.
चायनीज कंपनी शाओमीला भारतात येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त तीन दिवसांसाठी कार्निवाल (डिस्कउंट ऑफर आणि सेल) जाहीर केले आहे. हा सेल 20 जुलैपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये शाओमीचे स्मार्टफोन खरेदी करताना किमतीत स्पेशल डिस्काउंट तसेच 1 रुपयांत स्मार्टफोन खरोदी करण्याची संधी मिळणार आहे.
फ्लॅश डील सेल दर दिवशी दुपारी २ वाजता प्रसारित करण्यात येईल. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुमचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
शाओमी आपल्या रजिस्टर यूजर्ससाठी काही ठराविक स्मार्टफोन मात्र 1 रुपयांना उपलब्ध करून देणार आहेत. या सेलच्या पहिल्या दिवशी 10 शाओमी MI5 आणि 100 MI 20000mAhचा पॉवर पॅक या ऑफरमध्ये सहभागी आहे.
याशिवाय शाओमीचा 10000mAhचा पॉवर पॅक, Mi ear कॅप्सूल हेडफोन, Mi in ear हेडफोन डिस्काउंटमध्ये मिळेल.