फ्री इंटरनेटसाठी मार्क झुकरबर्गचं नवं उपकरण
फ्री इंटरनेटसाठी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग प्रयत्नशिल आहेत. पण आता त्यांनी यासाठी ओपन सेल्यूलर लाँच केले आहे. झुकरबर्ग यांनी ही माहीती आपल्या ऑफिशिअल पेजमार्फत दिली. जिथे इंटरनेट सुविधा नाही, तेथील नागरिकांनाही इंटरनेटशी जोडण्याचे आपले लक्ष आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठीच 'ओपन सेल्यूलर' लाँच करण्यात आल्याचे त्यांने सांगितले.
'ओपन सेल्यूलर' सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण आहे. यामध्ये 'एअरक्राफ्ट एक्विला' आणि 'हाय बीम बँडविथ' बसवण्यात आला आहे. याचा वापर करून तुम्ही दुर्गम भागातही इंटरनेटची सुविधा मिळवू शकता असा दावा झुकरबर्ग यांचा आहे. भारतात याला मोठा धक्का बसला असून याचा विरोध करणारे नेट न्यूट्रॅलिटीचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगितले आहे.
या सिस्टिमचा आकार बुटाच्या डब्यासारखा आहे. याची फ्रिक्वेन्सी 10 किलोमीटरपर्यंत असून 1500 लोक यामार्फत इंटरनेट वापरु शकतात.
झुकरबर्गच्या मते, 400 कोटींपेक्षा आधिक लोक इंटरनेट वापरत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहणे हे मोठे आव्हान आहे. मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, 'ओपेन सेल्यूलर'चं डिझाइनच ओपन आहे. याच्या वापराने तुम्हाला अतिशय दुर्गम भागातही इंटरनेटची सुविधा मिळू शकते.