Xiaomi Pad 6 Max : चिनी स्मार्टफोनमेकर कंपनी शाओमी (MI) या महिन्यात एक भन्नाट टॅबलेट लाँच करणार आहे. Xiaomi Pad 6 Max हा येत्या 14 आॅगस्टला भारतात लाँच होणार आहे. Xiaomi चा हा टॅबलेट आतापर्यंतचा सर्वात भारी स्पेसिफिकेशन असलेला टॅबलेट असणार आहे असा दावा कंपनीने केला आहे. Xiaomi मिक्स फोल्ड 3 आणि Xiaomi Band 8 Pro सोबत येत्या 14 आॅगस्टला रोजी Xiaomi Pad 6 Max लाँच करणार असल्याची माहिती कंपनाीने दिली. कंपनीने Xiaomi च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. 


आहेत दमदार फिचर्स


Xiaomi Pad 6 Max ग्रे कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाईल. यात 14-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह 8 स्पीकर्स मिळतील. वापरकर्त्यांना त्याच्या टॅबलेटच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देखील मिळेल.ग्राहकांना या टॅबलेटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. 


Xiaomi Pad 6 Max मध्ये ग्राहकांना 12GB RAM मिळेल. फास्ट चार्जिंगकरता 67W चार्जिंगसाठी सपोर्ट करेल. त्याच्या फ्रंट कॅमेऱ्यात ToF सेन्सर देखील असेल. या सेन्सरच्या माध्यमातून फेस मॅपिंगची सुविधा दिली जाऊ शकते. 


सोबतच Xiaomi मिक्स फोल्ड 3 हा फोनदेखील लाँच होणार आहे. भारतातील या फोनची किंमत 1,85,300 असण्याची शक्यता आहे. तर फोनचा डिस्प्ले 8.01 Inches , रँम 12 GB आणि स्टोरेज 256 GB मिळू शकते. डिव्हाइसला 50W किंवा 67W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,800mAh बॅटरी मिळू शकते.हा स्मार्टफोन नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 शी स्पर्धा करेल. तसेच 14 आॅगस्ट रोजीच कंपनी Xiaomi Band 8 Pro देखील लाँच करणार आहे. Xiaomi Band 8 Pro मध्ये तुम्हाला 1.6 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यामध्ये ऑल्वेज ऑन मोड दिला गेला आहे. हे बँड 50 मीटरपर्यंत पाण्यात काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. डिवाइसमध्ये 190mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी तब्बल 16 दिवसांपर्यंत टिकू शकते. तसेच, या बँडमधेय बरेच फिटनेस फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, मेन्स्ट्रुअल सायकल ट्रॅकर इ. आरोग्यविषयक फीचर्स मिळतील. याशिवाय, रनिंग आणि बॉक्सिंगसारखे स्पोर्ट्स मोड्सदेखील मिळणार आहेत. बँडमध्ये इनबिल्ट गेम्स सुद्धा आहेत. 


 


इतर महत्वाच्या बातम्या