Who is the highest paid person on Instagram 2023, Cristiano Ronaldo Instagram one Post Earning: प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. एका इन्स्टा पोस्टवरून तो जवळपास 26 कोटी कमावतो. रोनाल्डोनं आतापर्यंत पाच वेळा फुटबॉल 'बॅलन डी'ओर' हा प्रतिष्ठेचा खिताब पटकावला आहे. रोनाल्डो सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर या यादीत विराट कोहली आणि भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा या दोघांचाही समावेश आहे.


यापूर्वी जुलैमध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर 2017 नंतर प्रथमच फोर्ब्सनं रोनाल्डोला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं होतं. आता रोनाल्डो 2023 च्या इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये टॉपवर आहे. 


ही यादी इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर हेडक्वार्टरनं संकलित केली आहे. जी इंटरनल (अंतर्गत) आणि सार्वजनिक (पब्लिकली) उपलब्ध डेटाच्या आधारे तयार केली गेली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक युजर Instagram आणि YouTube वर पोस्टसाठी किती शुल्क आकारतो, याची माहिती देण्यात आली आहे.  


पोर्तुगालसाठी फुटबॉल खेळणारा क्रिस्टियानो रोनाल्डो प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवरून 26.74 कोटी रुपये (3.23 डॉलर दशलक्ष) कमावतो. रोनाल्डोच्या इंस्टाग्रामवरील फॅनबेसचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याचे 600 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.






रोनाल्डोनंतर लिओनेल मेस्सीचा नंबर; 'द रॉक' मागे


या यादीत रोनाल्डोनंतर लिओनेल मेस्सी आहे. अर्जेंटिनासाठी विश्वचषक जिंकणारा मेस्सी प्रत्येक इन्स्टा पोस्टसाठी 21.52 कोटी रुपये घेतो. हे दोघेही अनेक क्रीडा क्षेत्रातील सुपरस्टार्सच्या पुढे आहेत. गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ, रिअॅलिटी स्टार काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन 'द रॉक' जॉन्सन यांसारख्या सेलिब्रिटींपेक्षा रोनाल्डो आणि मेस्सी पुढे आहेत.


विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांचीही इन्स्टावरुन कोट्यवधींची कमाई


ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याशिवाय दोन खेळाडूंचा टॉप 20 यादीत समावेश आहे. त्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यांचाही समावेश आहे. नेमार पॅरिस सेंट-जर्मन संघातील सहकारी आणि फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे दोघेही इन्स्टा पोस्टवर जवळपास दुप्पट कमाई करतात. 


इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा टिकटॉक स्टार खाबी लेम  (Khaby Lame) या यादीत 40 व्या क्रमांकावर आहे. लेम त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन जेवढे पैसे कमावतो, त्याच्या जवळपास 10 पट रक्कम रोनाल्डो इंस्टाग्राम पोस्टमधून कमवतो. विराट कोहली एका इन्स्टा पोस्टवरून 11.45 कोटी रुपये कमावतो. तर प्रियांका चोप्रा या यादीत 29 व्या क्रमांकावर आहे. ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते.