Xiaomi 13 Pro Smartphone Launch : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने नुकताच भारतात Xiaomi 13 Pro, Xiaomi 13 सीरिजमधील फ्लॅगशिप डिव्‍हाईस लॉन्‍च केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लॉन्च झाला होता. काल (26 फेब्रुवारी रोजी) हा स्मार्टफोन भारतात देखील लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून तुम्हाला Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळत आहे. या स्मार्टफोनची चार्जिंग टेक्नॉलॉजी अनेकांना आकर्षित करतेय. कारण यात 120W फास्ट चार्जिंग फीचर आहे. या स्मार्टफोनची स्पर्धा Apple, Vivo, Samsung आणि Oppo यांसारख्या कंपन्यांच्या प्रीमियम प्रॉडक्टशी होईल.  


Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन : 


1. डिस्प्ले : 6.73 इंच कर्व्ह डिस्प्ले


2. मागील कॅमेरा : 50MP कॅमेरा


3. फ्रंट कॅमेरा : 32MP सेल्फी कॅमेरा


4. रॅम : 12 जीबी रॅम


5. स्टोअरेज : 512GB स्टोरेज


6. प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 प्रोसेसर


7. चार्जिंग : 120W फास्ट चार्जिंग


8. बॅटरी : 4,820mAh बॅटरी


Xiaomi 13 Pro चे वैशिष्ट्य


स्मार्टफोनमध्ये MIUI 14 देण्यात आला आहे. जर कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 1-इंच 50MP प्रायमरी सेन्सर आहे, जो हायपर OIS आणि Octa-PD फेस फोकसिंगला सपोर्ट करतो. यासोबतच 50MP अल्ट्रा वाईड आणि टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा कर्व्ह डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1900 nits, HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे. Xiaomi 13 Pro ची बॅटरी 50W वायरलेस आणि 120W वायर फास्ट चार्जिंगसह चार्ज केली जाऊ शकते.


Xiaomi 13 Pro किंमत किती? 


Xiaomi ने अद्याप या स्मार्टफोनची भारतीय किंमतीचा खुलासा केलेला नाही. पण, Amazon वर स्मार्टफोनच्या लिस्टवरुन असा अंदाज लावला जातोय की, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता स्मार्टफोनची किंमत घोषित केली जाईल. जागतिक बाजारात Xiaomi 13 Pro ची किंमत 1299 युरो (सुमारे 1,13,887 रुपये) आहे.


Nokia स्मार्टफोन घरबसल्या दुरुस्त करा 


एकेकाळी मोबाईल फोन उद्योगातील प्रसिद्ध कंपनी नोकिया आज ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन गोष्टींचा वापर करत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नोकियाने एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो खराब झाल्यास तुम्ही घरबसल्या दुरुस्त करु शकता. या फोनचे नाव Nokia G22 आहे. या मोबाईल फोनचे मागील कव्हर 100% रिसायकल प्लास्टिकपासून बनवले आहे. तुम्ही Nokia G22 ची बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट इत्यादी घरबसल्या ठीक करु शकता. यासाठी कंपनी तुम्हाला मोबाईल फोनसोबत iFixit किट मोफत देत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Smartphone : Xiaomi 13 Pro आज भारतात होणार लॉन्च; कधी, कसा, कुठे पाहाल लॉन्चिंग इव्हेंट? वाचा A to Z माहिती