'हे' अॅप स्मार्टफोनमधील बॅटरीसाठी धोकादायक

याशिवाय हीमे, किंवा सध्या सर्वात जास्त चर्चित असलेले पोकेमॉनसारखे गेमचे अॅपही सर्वाधिक फोनची बॅटरी वापरतात. त्यामुळे हे अनइन्स्टॉल करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जर तुम्हाला डिफॉल्ट ब्राउजर अॅप व्यतिरिक्त, इन्स्टॉल केलेले अतिरिक्त ब्राउजिंग अॅप तुमच्या स्मार्टफोनवरून अनइन्स्टॉल केल्यास तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढते.

जर तुम्हाला सतत फोटो काढणे, अन् एडिट करून सोशल मीडायावर शेअर करण्याची सवय असेल, तर त्याच्याशी संबंधित अॅप सर्वात जास्त बॅटरीचा वापर करतात. हे अॅप तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ कमी करतात.
कोणत्याही स्मार्टफोनसाठी अॅन्टी व्हायरसचं अॅप महत्त्वाचेच असतं. पण बॅटरी सेव्हर किंवा रॅम मॅनेजमेंटसारखे अॅप वेळोवेळी कार्यरत राहिल्याने, आणि स्मार्टफोनला सतत स्कॅन करण्यासोबतच पोटेंशिअल थ्रेटपासूनही बचाव करत असल्याने तुमची बॅटरी लवकर संपते.
सर्वांच्याच पसंतीचे फेसबुक अॅप हेदेखील तुमच्या स्मार्टफोनला हानिकारक आहे. हे अॅप अनेकदा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपवण्यास कारणीभूत ठरते.
या यादीत बॅटरी सेव्हर किंवा रॅम क्लिनर हे पहिले अॅप आहे. हे अॅप तुम्ही मोबाईलवर कोणतेही काम करत नसतानाही कार्यरत राहते.
आजच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणे ही अनेक यूजर्सची समस्या असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन अॅपची माहिती देणार आहोत, जे तुमच्या स्मार्टफोनला हानीकारक आहेत. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा बचाव करायचा असेल, तर तत्काळ असे अॅप अनइन्सटॉल करा!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -