‘या’ 8 स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट
सॅमसंग गॅलेक्सी J5 – 12 हजार 390 रुपये किंमतीच्या या स्मार्टफोनवर 1 हजार 50 रुपयांची सवलत मिळत असून, नवीन खरेदी किंमत 11 हजार 340 रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोटो X स्टाईल – फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर 6 हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 26 हजार 999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 20 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक कंपन्या आणि ऑनलाईन वेबसाईट्स ग्राहकांना ऑफर्स देत आहेत. नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुम्ही या ऑफर्सचा नक्कीच विचार करायला हवा. पाहूया कोणकोणत्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे...
LG G5 – हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 6 हजार रुपये डिस्काऊंटनी खरेदी करु शकता. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 52 हजार 990 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवरील ऑफरनुसार हा स्मार्टफोन 46 हजार 990 रुपयांना खरेदी करु शकता.
इंटेक्स क्लाऊड ब्रिझ – 4 हजार 999 रुपयांचा स्मार्टफोन तुम्ही 3 हजार 499 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला या स्मार्टफोनवर 1400 रुपयांची सूट मिळत आहे.
मायक्रोमॅक्स Unite 4 Pro – या स्मार्टफोनवर 2 हजार 500 रुपयांची सूट जाहीर झाली आहे. 9 हजार 499 रुपयांचा हा स्मार्टफोन 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
शाओमी Mi5 – या स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांची सूट जाहीर झाली असून, 24 हजार 999 रुपयांचा हा स्मार्टफोन 22 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
लेनोव्हो वाईब K5 प्लस – एक हजार रुपयांच्या सवलतीनंतर 7 हजार 499 रुपयांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 8 हजार 499 रुपये आहे.
मोटो X प्ले – 3 हजार रुपये फ्लॅट डिस्काऊंटनंतर मूळ 18 हजार 999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 15 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची खरेदी करु शकता.