Smartphone : आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) ही एक महत्त्वाची गरज होत चालली आहे. याचं कारण म्हणजे आपलं बहुतांश कामाची जागा टेक्नॉलॉजी (Technology) पर्यायाने स्मार्टफोनने घेतली आहे. यासाठीच अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्याही स्मार्टफोनचे नवनवीन ब्रॅंड आणि अॅडव्हान्स फीचर्स बाजारात लॉन्च करत असतात. अपग्रेड करत असतात. यामध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोनपासून ते प्रीमियम फोनचाही समावेश आहे. तसं, पाहायला गेलं कर प्रत्येक स्मार्टफोनची स्वत:ची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. यामुळे हे स्मार्टफोन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे ठरतात.
स्मार्टफोन स्टोरेज
अनेकदा आपल्यासाठी कोणता स्मार्टफोन योग्य आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. याचं कारण म्हणजे स्मार्टफोनच्या बाबतीत आपल्याला पुरेशी माहिती नसते. यामध्ये स्मार्टफोनमध्ये स्टोरेजची भूमिका काय असते? आणि किती प्रकार आहेत? आपल्या गरजेनुसार किती स्टोरेज आवश्यक आहे? बाबतही माहिती असणं गरजेचं आहे. पण, अनेकदा ग्राहकांन याचीच कल्पना नसते. तर, या ठिकाणी तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज किती महत्त्वाचं आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत.
स्टोरेजचे किती प्रकार आहेत?
रॅम, रॉम आणि फ्लॅश स्टोरेजबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का की हे मेमरीचे असे एकूण तीन प्रकार आहेत. यासाठीच या स्टोरेजच्या प्रकाराबद्दल जाणून घेऊयात.
रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी)
सर्वात आधी, RAM बद्दल जाणून घेऊयात. RAM बद्दल, आपण अनेकदा ऐकतो की आपल्या स्मार्टफोनमध्ये 6GB किंवा 8GB RAM आहे. RAM किंवा रँडम-ऍक्सेस मेमरी हा एक प्रकारचा मेमरी आहे जो तुमच्या फोनच्या प्रोसेसरद्वारे वापरला जाणारा डेटा संग्रहित करतो.
RAM मध्ये फक्त तात्पुरती माहिती साठवली जाते. जी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ठराविक कालावधीसाठी उपयोगी असते आणि ती लवकरच पूर्ण करणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्या फोनवर जी काही ॲक्टिव्हिटी करता त्यावर रॅमचा परिणाम होतो. म्हणजेच, तुमचा फोन एकाच वेळी अनेक गोष्टी करू इच्छित असल्यास, यासाठी फोनमध्ये अधिक रॅम असणं गरजेचं आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 2GB, 4GB, 6GB, 8GB, 12GB, 16GB आणि आता 24GB रॅमचा ऑप्शन मिळतो. तुम्ही तुमच्या बजेटनुसार रॅम निवडू शकता.
तुमच्या स्मार्टफोनचा रॅम किती महत्त्वाचा आहे?
तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमच्याजवळ जितका अधिक RAM असेल, तितक्या वेगाने तुम्ही ॲप्स ॲक्सेस करू शकाल आणि कोणत्याही डिस्टन्सशिवाय ॲप्समध्ये स्विच करू शकाल. जेव्हा तुम्ही RAM शिवाय दुसऱ्या ॲपवर स्विच करता तेव्हा ॲप्स क्रॅश होतील, ज्यामुळे तुमचा फोन स्लो होतो. यासाठी नेहमी स्मार्टफोन खरेदी करताना कमीत कमी 4 जीबी रॅम किंवा 6 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन घेण्याचा प्रयत्न करा. तसेच, जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर किमान 8GB रॅम असलेला स्मार्टफोन खरेदी करा. तसेच, जर चांगला स्पीड हवा असल्यास 16GB RAM आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
iOS vs Android : ...यासाठी Android डिव्हाईस iOS च्या मागे आहेत; जाणून घ्या याची पाच कारणं