31 डिसेंबरनंतर 'या' स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद!
त्यामुळे आपल्याला आपले स्मार्टफोन अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन अपग्रेड करण्याची गरज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या सिस्टिमवरच आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे.
31 डिसेंबर 2016 नंतर 'त्या' स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
व्हॉट्सअॅपनं आपल्या सिंबियन यूर्जसला यासंबंधी नोटिफिकेशन देखील पाठवणं सुरु केलं आहे.
व्हॉट्सअॅपनं एका ब्लॉगपोस्टमधून जाहीर केलं होतं की, 31 डिसेंबर 2016नंतर काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही.
असे स्मार्टफोन वापरणाऱ्यांची जगभरात बरीच संख्या आहे.
नोकियाचे जवळजवळ सर्वच हाय-एंड स्मार्टफोन सिंबियन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहेत. याची एन सीरीज देखील सिंबियन ओएसवर आधारित आहे.
या यादीमध्ये सिंबियन सोबत ब्लॅकबेरी, Nokiaची S40 Series, नोकिया सिम्बियन s60, Android 2.1, Android 2.2 आणि Windows Phone 7.1 ओएसवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या सर्व स्मार्टफोनवर पुढील वर्षी व्हॉट्सअॅप दिसणं बंद होणार आहे.
नोकिया, ब्लॅकबेरी, विंडोजसह काही स्मार्टफोन यूजर्संना व्हॉट्सअॅप 31 डिसेंबरला मोठा झटका देणार आहे. या स्मार्टफोनवर 31 डिसेंबर 2016 नंतर व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -