अँड्रॉईड यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचं Video Calling फीचर लाँच!
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 09:39 PM (IST)
1
सध्या हे फीचर विंडोज आणि अँड्रॉईड फोनवर उपलब्ध आहे. मात्र ते iOS वर कधी उपलब्ध होणार याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
2
इतकंच नाही तर तुम्हाला मिस्ड कॉलचं नोटिफिकेशनही येईल. त्यावर टॅप करुन तुम्ही कॉल बॅक करु शकता.
3
याशिवाय तुम्हाला फ्रंट कॅमेरा किंवा रिअर कॅमेराचा पर्यायही निवडता येणार आहे.
4
व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला केवळ कॉलिंग बटणवर जाऊन व्हॉईस आणि व्हिडीओ ‘Voice’/ ‘Video’ या पैकी एक पर्याय निवडायचा आहे.
5
मागील आठवड्यात या अॅपनं विंडोज यूजर्ससाठी हे फीचर जारी केलं होतं.
6
व्हॉट्सअॅपचं बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरु झालं आहे. कंपनीनं आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी आता हे फीचर जारी केलं आहे. व्हॉट्सअॅप बिटा टेस्टर्ससाठी हे फीचर रोल आऊट होणं सुरु झालं आहे.