WhatsApp Upcoming Feature : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील व्हॉट्सअॅपने असं एक नवीन फिचर लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आता यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप यूजर्सना आता ग्रुप बनवण्यासाठी कोणत्याही नावाची गरज भासणार नाही, म्हणजेच आता नाव नसतानाही ग्रुप बनवता येणार आहे. 


व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरची माहिती स्वत: मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मार्क झुकरबर्ग म्हणाले की, लवकरच यूजर्सना व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स नाव न टाकताही मित्रांबरोबर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करू शकतील. म्हणजेच ग्रुपच्या नावाची गरज भासणार नाही. मार्क झुकरबर्ग यांनी पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रूपच्या आधारे ग्रूपचं नाव देण्यात येईल. पण, जर अॅडमिनला दुसरं नाव ठेवायचं असेल तर तुम्ही नावंही ठेवू शकता. व्हॉट्सअॅप वेगाने प्लॅटफॉर्म अपडेट करत आहे. अलीकडेच, कंपनीने वापरकर्त्यांना एचडी फोटो पाठवण्याची वैशिष्ट्ये दिली आहेत. 


सध्या व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करण्यासाठी यूजर्सना ग्रूपला नाव देणे आवश्यक आहे. तर फोटो आणि ग्रुपचे डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. लवकरच यूजर्सना ग्रूपला नाव देण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे. त्यामुळे यूजर्स कोणत्याही नावाशिवाय व्हॉट्सअॅप ग्रूप अगदी सहज तयार करू शकतील.  


फक्त इतके यूजर्स अॅड होऊ शकतील


व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नावाशिवाय फक्त 6 लोकांनाच अॅड करता येणार आहे. जर 6 पेक्षा जास्त लोकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला असेल तर तुम्हाला त्या ग्रुपला नाव द्यावे लागेल. याव्यतिरिक्त, नावाशिवाय ग्रूपमधील प्रत्येक सदस्याच्या फोनवर ग्रूपचे नाव वेगळ्या पद्धतीने दिसेल. म्हणजेच ज्या नावाने ग्रुप मेंबरने लोकांचे कॉन्टॅक्ट सेव्ह केले असेल, त्या ग्रुपचे नाव प्रत्येकाच्या फोनमध्ये दिसेल. उदाहरणार्थ, जर कोणी X आणि Y सेव्ह केले असेल आणि कोणी P आणि Z सेव्ह केले असेल, तर दोन्ही फोनमध्ये ग्रुपचे नाव वेगळे असेल. ग्रुपचं नाव पहिल्या यूजर्ससाठी XY आणि दुसऱ्यासाठी PZ असू शकते. व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की, ते पुढील काही आठवड्यांत अँड्रॉइड, iOS आणि वेबवर जागतिक स्तरावर आपल्या यूजर्ससाठी हे फीचर आणणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Meta New Feature : मेटाचं प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल, युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सेवा लवकरच होणार सुरू