WhatsAppचं यूजर्ससाठी खास नवं फीचर
रिकॉल फीचर हे अनसेंड किंवा रिव्होक या नावानंही चर्चेत आहे. यामध्ये टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, जीआयएफ यासारखे पाठवलेले मेसेज अनसेंड करता येऊ शकतात. यासाठी 5 मिनिट वेळ मिळणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसंच अशीही माहिती मिळते आहे की, व्हॉट्सअॅप रिकॉल फीचरवरही काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅपच्या 2.17.30 व्हर्जन किंवा त्याच्यावरच्या वर्जनसाठी येऊ शकतं.
याशिवाय नव्या अपडेटमध्ये कंप्रेशन न करताही फाईल पाठवता येणार आहे. म्हणजेच आता व्हॉट्सअॅपवर फाईल कंप्रेस होणार नाही. ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओची क्वॉलिटी ओरीजनल राहणार आहे.
iOS यूजर्स कोणतीही फाईल जिची साइज 128 एमबी आहे ती शेअर करु शकतात. तर अँड्रॉईडसाठी फाईल साइज 100 एमबी आहे. आता सध्या व्हॉट्सअॅपवर 64 एमबीपर्यंतची फाइल शेअर करु शकतो.
या फीचरमध्ये यूजर आपल्या व्हॉट्स अॅपवर प्रत्येक फाईल शेअर करु शकतं. पण यामध्येही फाईलच्या साइजची मर्यादा असणार आहे.
WinBeta च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपनं आपलं नवं फीचर रोल आऊट करणं सुरु केलं आहे. दरम्यान, आतापर्यंत जास्त यूजर्सला हे अपडेट मिळालेलं नाही.
व्हॉट्सअॅपवर लवकरच doc, ppt, pdf, docx यासारख्या फाइलशिवाय इतरही फाईल सपोर्ट करणार आहे. म्हणजेच apk, mp3 या फाईलही व्हॉट्स अॅपवर पाठवता येऊ शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -