मुंबई : WhatsApp यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे, बहुप्रतीक्षित आणि उपयोगी असा Night Mode फीचर आता इंस्टेंट मेसेजिंग अॅपच्या कॅमेरा इंटरफेसमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या हा अपडेट Android यूजर्ससाठी बीटा वर्जन 2.25.22.2 अंतर्गत टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
काय आहे WhatsApp चा Night Mode?
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने आपला इन-बिल्ट कॅमेरा अधिक स्मार्ट आणि यूजर-फ्रेंडली करण्यासाठी हे नवीन Night Mode फीचर आणले आहे. अंधारात किंवा कमी प्रकाशात फोटो काढताना आता फोटो अधिक ब्राइट, क्लिअर आणि डिटेलमध्ये दिसतील, तेही WhatsApp कॅमेरावरूनच. यामुळे थर्ड पार्टी कॅमेरा अॅप्स वापरण्याची गरज उरणार नाही.
नाइट मोड कसा वापरायचा?
कॅमेरा इंटरफेसमध्ये तुम्हाला एक चंद्राच्या आकाराचं आयकॉन दिसेल, जे फक्त डार्क एन्व्हायर्नमेंटमध्येच दिसेल. हे आयकॉन टॅप केल्यानंतर नाइट मोड अॅक्टिव्ह होईल आणि त्यानंतर घेतलेले फोटो अधिक स्पष्ट आणि नॉइज-फ्री असतील.
फक्त एक फिल्टर नाही, संपूर्ण सुधारणा
हा कोणताही साधा फिल्टर नाही. WhatsApp ने यामध्ये सॉफ्टवेअर-बेस्ड सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे exposure balance, noise reduction आणि brightness enhancement होते. त्यामुळे फोटो अधिक प्रोफेशनल आणि डिटेलमध्ये दिसतो.
युजर्सकडे राहील पूर्ण कंट्रोल
WhatsApp ने हे फीचर ऑटोमॅटिक न ठेवता मॅन्युअल स्वरूपात दिलं आहे. म्हणजेच युजरला हवे असल्यासच ते सुरू करता येईल. हे विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे रात्री उशिरा status अपडेट करतात किंवा indoor कम प्रकाशात फोटो घेण्यास प्राधान्य देतात.
पुढील अपडेट्स काय असतील?
WhatsApp ने यापूर्वी इमेज इफेक्ट्स आणि फिल्टर्स कॅमेरा इंटरफेसमध्ये जोडले होते. पण हा नवा Night Mode फीचर हे कॅमेरा क्वालिटीला एक नवं व्यावसायिक स्तर देतो. पुढील काही आठवड्यांत हा अपडेट अधिकाधिक यूजर्सपर्यंत पोहोचणार आहे.
Night Mode मुळे WhatsApp कॅमेरा आता केवळ चॅटिंगसाठीच नव्हे, तर फोटोग्राफीसाठीही अधिक प्रभावी ठरणार आहे.
ही बातमी वाचा: