Voter ID Card : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा 2024 निवडणुकीचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. त्यानुसार 7 टप्प्यात निवडणुका (Election) होणार आहेत. अंतिम टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा तर जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही लोकांनी काही लोकांकडे वोटर आयडी नाही त्यांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वोटर आयडी बनवण्याची प्रक्रिया माहीत नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी सांगणार आहोत. 


ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होतील त्यांनाच निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासा. मतदार यादीतील नाव तपासणे, मतदार कार्ड डाऊनलोड करणे, नवीन मतदार कार्ड बनवणे अशी कामे तुम्हाला ऑनलाईन करता येतील.


ECI ने मतदारांसाठी अनेक ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये मतदार कार्ड डाऊनलोड करणे आणि मतदार यादीत नावे समाविष्ट करणे समाविष्ट आहे. यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलला (https://voters.eci.gov.in) भेट देऊन तुम्ही अनेक ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता.


मतदार यादीतील नाव कसे तपासायचे?


तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव ऑनलाईन तपासू शकता. त्यासाठी (https://electoralsearch.eci.gov.in/) या लिंकवर क्लिक करा.


तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक आठवत असेल तर तो टाका आणि तुमचं नाव यादीत शोधा.


तुम्हाला EPIC क्रमांक आठवत नसल्यास, दुसरा ऑप्शन निवडा, तुमचा तपशील टाका आणि शोधा.


टाकलेल्या माहितीनुसार, तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असल्यास ते दिसेल.


मतदार कार्ड कसं डाऊनलोड करावे?


मतदार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या (https://voters.eci.gov.in/). या मतदार सेवा पोर्टलवर जा.


'E-EPIC डाऊनलोड करा' लिंकवर क्लिक करा.


तुमचा EPIC क्रमांक (मतदार आयडी क्रमांक) किंवा फॉर्म क्रमांक एन्टर करा. 


'OTP Request' वर क्लिक करा.


तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल.


OTP एन्टर करा आणि 'Submit' वर क्लिक करा.


तुमचे e-EPIC (डिजिटल वोटर कार्ड) डाऊनलोड केले जाईल.


या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, मतदार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल क्रमांकाची मतदार कार्डावर आधीपासूनच नोंदणी केलेली असावी. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसल्यास मतदार कार्ड डाउनलोड होणार नाही. मोबाईल नंबर नोंदणी करण्यासाठी, तुम्ही फॉर्म 8 द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.


मतदार यादीत नाव टाकण्याची ऑनलाईन प्रक्रिया


तुम्हाला जर तुमचं नाव मतदार यादीत समाविष्ट करायचं असेल तर यासाठी मतदार सेवा पोर्टलवर जा. 


या ठिकाणी फॉर्म्स विभागात, सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणीच्या पर्यायामध्ये फॉर्म 6 वर क्लिक करा.


आता ऑनलाईन फॉर्म 6 भरा.


तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इत्यादी माहिती एंटर करा.


आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.


आता 'सबमिट' वर क्लिक करा.


महत्त्वाच्या बातम्या :


WhatsApp New Feature : ज्याच्यासाठी ठेवलंय स्टेटस त्याला आता पाहावंच लागणार; फक्त 'हे' काम करावं लागेल