Vodafone Idea Alert: व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम विश्वातील प्रसिद्ध कंपनीच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सांगितलं आहे की,  कंपनी एका अपडेटवर काम करत आहे, ज्या अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील 13 तास यूजर्स त्यांचे मोबाईल रिचार्ज करू शकणार नाहीत. यावरच आता कंपनीने एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिलं आहे. 


कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण? 


कंपनीने स्पष्टीकरण देत आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “ व्हीआय प्रीपेड रिचार्ज  (vodafone idea prepaid recharge) सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहे, असा दावा करणारे काही चुकीचे मीडिया रिपोर्ट्स आमच्याकडे आले आहेत. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना सावध करू इच्छितो.'' या निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, व्हीआयने (Vodafone-Idea) दिल्ली (Delhi) सर्कलमधील काही प्रीपेड युजर्ससाठी 22 जानेवारीच्या रात्रीपासून ते 23 जानेवारीच्या सकाळपर्यंत काही तासांच्या सिस्टम अपग्रेडबद्दल एसएमएसद्वारे सूचित केले आहे. या कालावधीत रिचार्ज सेवेमध्ये काही विलंब होऊ शकतो.'' कंपनीने पुढे म्हटलं आहे की, देशभरातील व्हीआय (vodafone idea) सेवा ग्राहकांसाठी सुरु राहणार आहे.



5G network reached 135 cities: 5G नेटवर्क 135 शहरांपर्यंत पोहोचले 


रिलायन्स जिओने (Reliance Jio 5G) आपले 5G नेटवर्क 135 शहरांमध्ये विस्तारले आहे. 5G नेटवर्कमध्ये (5G Network) ग्राहकांना 4G च्या (4G network) तुलनेत 30 ते 40 टक्के चांगला स्पीड आणि चांगला कॉलिंग अनुभव मिळतो. जर ग्राहकांना वेलकम ऑफरचा (jio 5g welcome offer) लाभ मिळाला असेल तरच ते Jio च्या 5G इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात.


How do I switch 5G on my phone? असं करा 5G नेटवर्कवर स्विच 


मोबाईल फोनमध्ये 5G इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी, तुमचा स्मार्टफोन 5G सपोर्ट (5g support mobile) असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या परिसरात 5G नेटवर्क असावे. जर या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असतील, तर तुम्ही मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये (5g network phon settings) जाऊन 5G नेटवर्क (5g Network Cities) निवडू शकता, त्यानंतर तुम्ही हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल.


इतर महत्वाची बातमी: