Chat GPT is Paid : चॅट जीपीटी (Chat GPT) हे सर्च इंजिन वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) कृत्रिम बुद्धिमत्ता. चॅट जीपीटी रे व्हर्जम आतापर्यंत फ्री होते. कंपनीचं आताचॅट GPT व्हर्जन 4 येणार आहे. नवं व्हर्जन येण्यापूर्वी कंपनीने आता सेवा पेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार
विकीपीडियाच्या (Wikipedia) स्वास्थ (Swastha) या उपक्रमाचे दिग्दर्शक कम्युनिकेश एक्सपर्ट (Communication Expert) आणि डेटा सायंटिस्ट (Data Scientist) अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे. OpenAI चे कंपनीने सॅम अल्टमन यांनी विविध देशाच्या नागरिकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर आधारित किंमत ठरवून सर्वसमावेशकता दाखवणे आवश्यक आहे.'
अभिषेक सूर्यवंशी यांचं ट्विट
चॅट जीपीटीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता
चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. चॅट GPT हे चॅटबॉट म्हणजेच सर्च इंजिन 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आलं होतं. लाँच झाल्यापासून चेट GPT चर्चेत आहे. चॅट GPT वर प्रत्येक व्यक्ती आणि तज्ज्ञ आपापले मत मांडताना दिसत आहेत. चॅट जीपीटीमुळे माणसांना नोकर्या मिळणार नाहीत, असं काहींचे म्हणणे आहे. चॅट जीपीटीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता आहे असं जाणकार म्हणतात.
What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?
AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञान माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.
Chat GPT By Open AI : Chat GPT काय आहे?
ChatGPT हे एक चॅटबॉट म्हणजेच एक प्रकारचं सर्च इंजित आहे. हे सॉफ्टवेअर OpenAI कंपनीकडून नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आलं आहे. सॅम अल्टमन (Sam Altman) OpenAI चे सीईओ (CEO) आहेत. कंपनी हे यामध्ये OpenAI च्या GPT-3 मधील भाषा मॉडेल्सच्या वापर करण्यात आला. चॅट GPT गुगलसारख्या अनेक सॉफ्टवेअर, सर्च इंजिनची जागा घेईल, असा अनेकांचा विश्वास आहे.
How Chat GPT Works : चॅट जीपीटी कशाप्रकारे काम करतं?
ओपनएआयने (OpenAI) चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण त्याला उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गुगल (Google) तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते, पण चॅट जीपीटी (Chat GPT) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT, जाणून घ्या जगात चर्चा असणारं हे चॅटबॉट काय आहे