Vodafone Idea Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं (VI - Vodafone Idea) नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग (Calling) आणि इंटरनेट सेवा (Internet Service) पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea Service) ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. 


व्हीआयचं नेटवर्क डाऊन


मुंबईमध्ये (Mumbai) अनेक ठिकाणी युजर्संना व्हीआयचं नेटवर्क वापरण्यात अडथळे येत आहे. काही यूजर्सना इंटरनेट वापरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत तक्रार केली आहे. ट्विटरवर अनेक व्हीआय युजर्सने तक्रार केली आहे की, त्यांना व्हीआय नेटवर्क चालत नाही. नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. व्हीआयचं नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांची कामं रखडली आहेत.  


व्होडाफोन आयडिया नेटवर्क जे आता VI नेटवर्क म्हणून ओळखले जाते, त्याची सोवा मागील एक तासापासून खंडीत आहेत. मुंबईमध्ये अनेकांनी VI नेटवर्क सेवा ठप्प झाल्याची तक्रार केली आहे. अनेक VI युजर्संनी नेटवर्क नसल्याची तक्रार केली आहे. हा विषय ट्विटरवर प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान याबाबत कंपनीने अद्याप काही भूमिका स्पष्ट केलेली नाही.


इंटरनेट आणि कॉलिंग सेवा बाधित


गेल्या काही दिवसांपासून देशभरात VI चं नेटवर्क स्लो झालं आहे. आता आज सकाळपासून मुंबई शहरात व्हीआयच्या सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचे सांगितलं जातं आहे. खासकरून इंटरनेट सेवा सकाळपासून बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच अनेक वापरकर्त्यांना कॉलिंगच्या सेवेतही अडचणी येत आहेत.


युजर्सची सोशल मीडियावर तक्रार