Samsung Galaxy S23 Ultra vs S22 Ultra: Samsung ने आपली S23 सीरीज जागतिक स्तरावर सादर केली. या अंतर्गत कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra असे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या सीरीजचा टॉप-एंड प्रकार बाजारात चर्चेचा विषय राहिला आहे. कारण यात 200-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 8th जनरेशन 2 SOC चा सपोर्ट आहे. S23 Ultra ची किंमत 1,24,999 रुपयांपासून सुरू होते आणि 1,55,000 रुपयांपर्यंत जाते. सॅमसंगने गेल्या वर्षी S22 सीरीज लॉन्च केली होती. यातच आज आम्ही तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा आणि गॅलेक्सी S23 अल्ट्रा मध्ये काय बदलले आहे, हे सांगणार आहोत. कंपनीने यात खरोखर काही मोठे बदल केले आहेत की नाही हे जाणून घ्या.
S22 च्या तुलनेत S23 अल्ट्रामध्ये मिळणार या नवीन गोष्टी
Samsung Galaxy S23 Ultra जरी Galaxy S22 Ultra सारखा दिसत असला तरी कंपनीने यात काही किरकोळ बदल केले आहेत. डिस्प्लेच्या बाबतीत, कंपनीने S23 Ultra मध्ये ब्राइटनेस 1750nits पर्यंत वाढवला आहे. मोबाईलची स्क्रीन 6.8 इंच आहे. जी 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Samsung Galaxy S22 Ultra पहिल्या जनरेशनच्या Gorilla Glass Victus 1 सह आला आहे, तर Galaxy S23 Ultra ला Gorilla Glass Victus 2 चे संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजे स्क्रीनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Samsung Galaxy S23 Ultra हा लॅव्हेंडर, ग्रीन, क्रीम आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये येतो तर S22 अल्ट्रा फॅंटम ब्लॅक, फँटम व्हाइट, ग्रीन आणि बरगंडी रंगांमध्ये उपलब्ध होता.
परफॉर्मन्स
Samsung Galaxy S22 Ultra Snapdragon 8th Generation 2 SOC सह येतो. ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 12GB अंतर्गत स्टोरेजचा पर्याय मिळतो. तसेच तुम्ही हे मॉडेल 256GB, 512GB आणि 1 TB अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे Galaxy S22 Ultra स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 SOC वर काम करते. ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 12GB अंतर्गत स्टोरेज पर्याय मिळाला होता. तसेच तुम्ही हे मॉडेल 128GB, 256GB, 512GB आणि 1TB अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. फरक एवढाच आहे की तुम्हाला नवीन म्हणजेच S23 Ultra मध्ये 128 GB चा पर्याय मिळत नाही. नवीन प्रोसेसरमुळे Samsung Galaxy S23 Ultra वापरकर्त्यांना चांगले CPU आणि GPU परफॉर्मन्स देईल.
कॅमेरा
कॅमेराच्या बाबतीत Samsung Galaxy S23 Ultra 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि दोन 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्ससह येतो. तर Samsung Galaxy S22 Ultra तुम्हाला 108-megapixel ऑफर करतो. प्रायमरी कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 12-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि दोन 10 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा सपोर्ट मिळतो.