VIVO Mobile : विवोने आपल्या काही स्मार्टफोनच्या किंमती (Smartphone) कमी केल्या आहेत. त्यामुळे विवोचे(VIVO) काही फोन आता अनेकांना स्वस्तात खरेदी करता येणार आहे. Vivo Y200 5G आणि Vivo T2 5G ची किंमत सध्या समोर आली आहे. त्यासोबत अनेक फोनवर विविध ऑफर्सदेखील मिळणार आहे. 


Vivo Y200 5G ऑफर्स कोणते?


Vivo Y200 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 265 जीबी स्टोरेज पर्यायाची किंमत 23,999 रुपये आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. तसेच विवो इंडिया स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे.
Vivo Y200 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर एक ऑफर दिली जात आहे, ज्यानुसार दररोज 49 रुपयांच्या ईएमआय पर्यायावर फोन खरेदी करू शकतील. एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट, बँक ऑफ बडोदा, डीबीएस बँक, फेडरल बँक आणि इंडसइंड बँकेवर 2000 रुपयांचा कॅशबॅक खरेदी करता येणार आहे.


Vivo Y200 5G फिचर्स


Vivo Y200 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर सपोर्टसह येतो. Vivo Y200 5G मध्ये 64 एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये अँटी शेक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट मोड, सुपर नाईट मोड आहे. हा फोन डेझर्ट गोल्ड आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येतो.


Vivo Y27



Vivo Y27  स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटला 11,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा कार्डवर 1000 रुपयांच्या कॅशबॅकवर फोन खरेदी करता येणार आहे.
Vivo Y27 स्लीक 2.5 डी ग्लास बॉडी डिझाइनमध्ये येतो. फोनमध्ये 6.64 इंचाचा एफएचडी+ सनलाइट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा हेलियो जी 85 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन बर्गंडी ब्लॅक आणि गार्डन ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये येणार आहे.


Vivo T2 5G


Vivo T2 5G स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 रुपये आहे, तर फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. Vivo T2 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 5 G प्रोसेसर आहे. हा फोन 7.8 एमएम अल्ट्रा-थिन डिझाइनमध्ये येतो. हा फोन अमोलेड डिस्प्ले सपोर्टसह येतो. याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 90 हर्ट्झ आहे. फोनमध्ये 64  एमपी ओआयएस अँटी-शेक प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. फोनमध्ये 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 44  W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येतो.


इतर महत्वाची बातमी-


Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजचा सेल सुरू, हजारो रुपयांची होणार बचत, Bank Offers कोणते आहेत?