Google Valentine's Day 2023: वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो, असं म्हणलं जातं. पण 14 फेब्रुवारी हा वर्षातील असा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या पार्टनरसमोर आपण प्रेम व्यक्त करु शकतो. 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentines day Celebration) म्हणून साजरा केला जातो. आज 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentines day) निमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलचं डिझाईन खास आहे. गूगलच्या या डूडलमध्ये काय खास आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या प्रेमाच्या रंगात रंगलेल्या 'गूगल डूडल' बाबत...
गूगलच्या एनिमेटेड डूडलच्यामागे ब्लर इमेजमध्ये 'गूगल' असं लिहिलेलं दिसत आहे. या इमेजवर अनेक पाण्याचे थेंब दिसत आहेत. जर तुम्ही या डूडलवर क्लिक केलं तर तुम्हाला डूडलवरील एक थेंब खाली पडताना दिसेल. या पाण्याच्या थेंबामध्ये आणखी एक थेंब मिक्स होतो आणि एक हार्ट इमोजी तयार होतो. जर तुम्ही गूगल डूडलवर पुन्हा क्लिक केलं, तर या डूडलची माहिती तुम्हाला मिळाले. त्यामध्ये, 'रेनी डे सनशाइन व्हिल यू बी माइन' असं लिहिलेलं दिसत आहे.
14 फेब्रुवारी आहे खास
गूगलच्या या 'व्हॅलेंटाईन-डे' स्पेशल डूडलबद्दल दिलेल्या माहितीमध्ये लिहिलं आहे, 'आजचा व्हॅलेंटाईन डे हा दिवस वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोक या दिवशी भेटवस्तू, शुभेच्छा यांच्याद्वारे आपल्या पार्टनरबद्दल आपुलकी व्यक्त करतात. मध्ययुगात 14 फेब्रुवारी दिवशी पक्ष्यांच्या संभोगाच्या हंगामाची सुरुवात होते, असं इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या युरोपीय देशांमधील लोक मानत होते. आम्ही आशा करतो की तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसोबत हा दिवस साजरा कराल.'
'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. केवळ अविवाहित जोडपेच नाही, तर विवाहित लोकांमध्येही व्हॅलेंटाईन डे बद्दल खूप उत्साह असतो.
सर्च इंजिन गूगल हे वेगवेगळे डूडल तयार करत असतात. न्यू इअर, प्रजासत्ताक दिन अशा खास दिवसांसाठी गूगल हे त्यांचे खास डूडल तयार करतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :