Unihertz Tank 3 Smartphone : आतापर्यंत आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या अशा अनोख्या फोनबद्दल ऐकलं असेल, पाहिलं असेल. पण, काही स्मार्टफोनबद्दल (Smartphone) जाणून घेतल्यानंतर त्यांना खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. आजकाल बाजारत लॉन्च होणाऱ्या कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल कॅमेरे आणि जास्तीत जास्त काळ टिकणारे असे बॅटरी देत आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ज्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत तो स्मार्टफोन पाहिल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. कारण या स्मार्टफोनमध्ये 6000mAh-7000mAh बॅटरी नसून तब्बल 23800mAh बॅटरी बॅकअप आहे. हा स्मार्टफोन नेमका कोणता आहे त्याविषयी जाणून घेऊयात. 


खरंतर, Unihertz नावाची एक चीनी निर्माता कंपनी आहे. या कंपनीने Unihertz Tank 3 नावाचा फोन नुकताच लॉन्च केला आहे. कंपनीने हा रग्ड स्मार्टफोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सादर केला होता. कंपनीने हा फोन 16 GB, 512 GB स्टोरेज सह सादर केला आहे. याचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.


जागतिक स्तरावर या फोनची किंमत $499.99 ( 41375 रु.) ठेवण्यात आली आहे. तर चीनमध्ये ते 4,699 युआन ($650) मध्ये ऑफर केले जात आहे.


Unihertz Tank 3 फीचर्स कसे आहेत? 



  • फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिप आहे. हा फोन Android 13 वर काम करतो. फोनमध्ये 6.79-इंचाचा FHD+ (2460 x 1080 पिक्सेल) आहे, जो 120Hz डिस्प्ले (LCD) सह येतो.

  • कॅमेरा म्हणून, फोनमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये 200-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड युनिट आणि 64-मेगापिक्सलचा नाईट व्हिजन शूटर आहे.

  • पॉवरसाठी, फोनमध्ये 23,800mAh बॅटरी आहे आणि ती 120W फास्ट चार्जिंगसह येते. बॅटरीबाबत असे सांगण्यात आले आहे की, ती केवळ 90 मिनिटांत 0-9०% चार्ज होऊ शकते.

  • कंपनीचा दावा आहे की हा फोन 1800 तास (75 दिवस) बॅटरी बॅकअपसह येतो. यात 118 तासांचा कॉल टाईम, 98 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम, 48 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 38 तासांचा गेमिंग बॅकअप आहे.

  • फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68-रेटिंग मिळते. यात 40 मीटर लेसर रेंज फाइंडर आणि इन्फ्रारेड सेन्सर आहे. याशिवाय साईड बटन आणि फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या सुविधाही यामध्ये देण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


Different Types Of Number Plate : राष्ट्रपतींच्या वाहनापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत, वाहनांच्या Number Plate वरून जाणून घ्या त्याचा अर्थ