WhatsApp IP Protect Feature : जगभरात लाखो यूजर्स व्हॉट्सॲपचा (Whatsapp) वापर करतात. याचं कारण म्हणजे, यूजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन, व्हिडीओ-फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर अनेक प्रकारचे सेफ्टी फीचर्स देखील अपडेट होत असतात. यूजर्सची हीच सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी मेटाच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आयपी प्रोटेक्ट फीचर (WhatsApp IP Protect Feature) देण्यात आले आहे. याचा वापर करून तुम्ही WhatsApp आणखी सुरक्षित करू शकता. या ठिकाणी हे फीचर तुमच्या मोबाईलमध्ये कसं अॅक्टिव्ह करता येईल याच्या आम्ही काही सोप्या टिप्स शेअर करणार आहोत त्या जाणून घ्या. 


व्हाट्सएप आयपी प्रोटेक्ट फीचर कसं Active कराल?  


जर तुम्हाला हे फीचर तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्ह करायचं असेल तर यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  


स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करावं लागेल. 


स्टेप 2 : यानंतर तीन डॉट असलेल्या आयकॉनवर टॅप करा.


स्टेप 3 : सेटिंग पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


स्टेप 4 : यानंतर तुम्हाला प्रायव्हसी सेक्शनवर क्लिक करावं लागेल.


स्टेप 5 : या ठिकाणी तुम्हाला Advance settings चा ऑप्शन शोधावा लागेल आणि त्यावर क्लिक करावं लागेल.


स्टेप 6 : कॉलमध्ये प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस वर टॅप करा आणि तो अॅक्टिव्ह करा.


या फीचरचे फायदे काय आहेत?


व्हॉट्सॲपवर उपलब्ध असलेले हे फीचर चालू केल्याने तुमची सुरक्षा तर मजबूत होतेच पण तुम्हाला इतर काही फायदेही मिळतात.


गोपनीयता सुरक्षित राहील : WhatsApp वर कॉल करताना तुमचा IP पत्ता सुरक्षित राहील. तसेच तुमची माहिती कुठेही लिक होणार नाही. 


सुरक्षित लोकेशन : जर एखाद्याला तुमचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे फीचर चालू असल्यामुळे तो शोधू शकणार नाही.


कडक सुरक्षाव्यवस्था : व्हॉट्सॲप यूजर्सना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक फायदे मिळू शकतात. 


याचाच अर्थ, तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपचे अॅक्टिव्ह यूजर असाल तर तुम्ही देखील हे आयपी प्रोटेक्ट फीचर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतात. अनेकदा सोशल मीडियाच्या काळात सायबर क्राईमचे गुन्हे देखील घडताना दिसतायत. यांसारख्या प्रकरणांनाच आळा घालण्यासाठी व्हॉट्सअपचं हे फीचर तुम्ही डाऊनलोड करू शकतात. तसेच, या फीचरबाबत तुमच्या कुटुंबीय आणि मित्र-परिवाराला याबाबत माहिती देऊ शकता. 


महत्त्वाच्या बातम्या :


Infinix Smart 8 HD 9 हजारांचा फोन आता फक्त 1300 रुपयांत; पैसे वाचवण्यासाठी काय करावं लागेल?