Threads App Launched : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप भारतासह 100 हून अधिक देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. बरेच दिवस मेटा या अॅपवर काम करत होते जे अखेर लॉन्च झाले आहे. या अॅपमध्ये Twitter सारखेच सर्व फीचर्स देण्यात आले आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर देखील तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता. मेटा ने थ्रेड्स एक स्वतंत्र अॅप म्हणून लाँच केले आहे परंतु यूजर्स इन्स्टाग्रामच्या मदतीने त्यात लॉग इन देखील करू शकतात.


Threads App मध्ये Twitter सारखे सर्व फीचर्स दिलेले आहेत. यामध्ये, पोस्टची मर्यादा 500 शब्द दिली जात आहे, जी ट्विटरच्या 280 शब्द मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडिओंचा समावेश असू शकतो.


हे अॅप US, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये Apple आणि Google Android App Store वर उपलब्ध झाले आहे. म्हणजेच आता यूजर्स अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ट्विटरचे रिव्हल अॅप थ्रेड्स इन्स्टॉल करून हे अॅप वापरू शकतात.


Threads App ची वैशिष्ट्य


थ्रेड्स हे Instagram चे एक नवीन अॅप आहे जे यूजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर यूजर्सच्या मेसेजला रिप्लाय देऊन संभाषण सुरु करू शकतो. तसेच, यूजर्स आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील लॉग इन करू शकतात. मेटा हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याचा यूजर वर्ग 2 बिलियनहून अधिक आहे. यामध्ये टॉप ब्रॅंड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंक क्रिएटर्स यांचा समावेश आहे.


ट्विटरची होणार थेट स्पर्धा 


रिपोर्ट्सनुसार, थ्रेड्स अॅपला अ‍ॅक्टिव्हिटीपब सोशल-नेटवर्किंग प्रोटोकॉल जसे की मॅस्टोडॉन आणि Decentralized Social Media Apps तयार करण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की जे यूजर्स थ्रेडवर फॉलोअर्स तयार करतात ते इंस्टाग्रामपेक्षा मोठ्या स्तरावर यूजर्सशी संवाद साधू शकतील. यूजर्सला या अॅपमध्ये ट्विटरसारखा अनुभव मिळेल, या अॅपमध्ये तुम्हाला ट्विटरसारखेच फीचर्स मिळतील. म्हणजेच हे अॅप ट्विटरला थेट टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, अनेक दिवसांपासून ट्विटरवर सुरू असलेल्या बदलांमुळे नाराज झालेल्या ट्विटर यूजर्सना आता ट्विटरसारखे अॅप मिळणार आहे.


Threads App इन्स्टॉल करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा



  • सर्वात आधी Google Play Store वर जा आणि "Thread, an Instagram app" टाईप करा आणि अॅप इन्स्टॉल करा.

  • यानंतर, तुम्हाला खाली Instagram सह Login चा ऑप्शन दिसेल. यानंतर, तुमच्या WhatsApp वर लॉगिन कोड येईल, तो येथे भरा.

  • त्यानंतर,  “Import from Instagram” " वर क्लिक करा. आता Insta वरून तुमच प्रोफाईल एक्सेस केली जाईल. 

  • आता Continue show च्या पर्यायावर क्लिक करा.

  • अटी आणि नियम वाचून घ्या. यानंतर, फॉलो सेम अकाउंट्स (जे तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करता) वर क्लिक करा.

  • आता "Join Threads" वर क्लिक करा. अॅपल यूजर्स देखील हीच प्रक्रिया फॉलो करून अॅप वापरू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या :


Tecno Camon 20 pro 5G फोन लवकरच भारतात लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स