Tecno Camon 20 pro 5G :  स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नो भन्नाट स्पेसिफिकेशनचा फोन लाँच करणार आहे. येत्या 7 जुलै रोजी भारतात Tecno Camon 20 pro 5G  स्मार्टफोन लाँच करण्यात येईल. टेक्नोनं त्यांची कॅमन 20 सिरीज गेल्याच महिन्यात भारतात आणली होती. या सीरिजमधील Tecno Camon 20  आणि Tecno Camon 20 pro 5G  यासारखे स्मार्टफोन लाँच केले आहेत. कॅमन 20 प्रो 5जी फोनमध्ये जबदरस्त कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 प्रोसेसर मिळणार आहे. या फोनमध्ये इतरही भन्नाट स्पेसिफिकेशन्स आहेत. त्यामुळे रियलमी 11 प्रो. लावा अग्नी 2 आणि वनप्लस नॉर्ड सीई 3 या फोनला भारतात Tecno Camon 20 pro 5G स्मार्टफोन तकडी स्पर्धा देऊ शकतो. 


इतकी असेल किंमत 


मिळालेल्या माहितीनुसार, Tecno Camon 20 pro 5G  स्मार्टफोन 7 जुलै रोजी लाँच करण्यात येईल. या फोनची किंमत 35 हजार रूपयांपर्यंत असू शकते. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेंसर-शिफ्ट स्थित कॅमेरा दिला आहे. यामुळे वेगवान हालचाली दरम्यानही फोन दर्जेदार फोटो कॅप्चर करण्यास सक्षम आहे. आरजीबीडब्ल्यू प्रो टेक्नोलॉजी 208 टक्क्यांपेक्षा जास्त कॅमेरा रिझोल्यूशन दिलेला आहे. यामुळे कमी उजेडातही चांगले फोटो काढता येणार आहेत. 


भारताचा पहिला 108 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड-अँगलचा फोन


Tecno Camon 20 pro 5G फोन मायक्रो कॅपॅबिलिटीचा भारताचा पहिला 108 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड-अँगलचा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये  UHD सपोर्टेड 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामुळे सेल्फी फोटो आणि उच्च गुणवत्तेचे व्हीडिओ रेकॉर्ड करण्यास फोन सक्षम असेल. हा फोन रेसिस्टेंट सिरॅमिक फ्रेम आणि टेक्सचर्ड लेदरने बॅकसाईडची फिनिशिंग करण्यात आली आहे. यामुळे फोनला जबरदस्त लुक प्राप्त झाला आहे. या फोनला उत्कृष्ट डिझाइनसाठी गौरविण्यात आलं आहे. 2023 मध्ये युएसए गोल्ड म्यूज डिझाइन अॅवार्डतर्फे फोनच्या डिझाइनला मान्यता दिली आहे. याशिवाय हा फोन दोन आकर्षक रंगात उपलब्ध आहे. फोन डार्क वेल्किन आणि सेरेनिटी ब्लू या रंगात उपलब्ध होणार आहे.


512GB रॉम आणि 8GB प्लस 8GB रॅम


मिळालेल्या माहितीनुसार, Tecno Camon 20 pro 5G फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. या शक्तीशाली प्रोसेसरमुळे फोनचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे. हा फोन 512GB रॉम आणि 8GB प्लस 8GB रॅम उपलब्ध करून दिली आहे. Camon 20 pro 5G फोनमध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 45 वॅटच्या सी-टाईप  चार्जिंगला सपोर्टेड आहे. 



वाचा इतर महत्वाच्या बातम्या :