Twitter Blue : ट्विटर (Twitter)  आजपासून शुल्क न भरलेल्या व्हेरीफाइड अकाऊंट्सचे ब्लू टिक काढण्यास सुरुवात करणार  आहे. जर तुम्ही अजूनही ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेतले नसेल तर तुमच्या ट्विटरवरील ब्लू टिक आजपासून हटवली जाणार आहे. भारतात ब्लू टिकसाठी  900 रुपये प्रति महिना  मोजावे लागणार आहे.  यानुसार, अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे. एलन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले आहे.


ट्विटर ब्लू टिक एक प्रीमियम सर्व्हिस आहे. जी पूर्णपणे पेड आहे. यासाठी मंथली सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. ट्विटरचे अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात 900 रुपये मोजावे लागणार आहे येते. तर वेब यूजर्ससाठी याची किंमत फक्त 650 रुपये आहे.  ट्विटर यूजर्स 6 हजार 800 रुपयांचे  वार्षिक सब्सक्रिप्शन घेवू शकता.


ब्लू टीक ही  फक्त प्रसिद्ध प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत होती. यामध्ये राजकीय नेते, समाज कार्यकर्ते, सेलिब्रिटी, शास्त्रज्ञ आदी लोकांचा समावेश होता. एलन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय  घेण्यात आले आहे. आता कोणालाही पैसे देऊन ब्लू टीक घेता येणर आहे. मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन होणार आहे.


शुल्क भरण्याचे फायदे



  • जर तुम्ही  ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेतले तर तुम्हाला याचे अनेक फायदे होणार आहे. सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्विटचे कॅरक्टर लिमिट वढवून देण्यात येणार आहे.

  • थोडक्यात तुम्हाला 180 शब्दसंख्येचे कॅरक्टर लिमिट असणार नाही. 

  • तसेच सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्वीट एडिटचा पर्याय देखील उफलब्ध होणार आहे. 

  • ट्विटर  ब्लू सब्सक्रायबरला टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन मिळणार आहे


आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्या युजर्सनाचं ट्विटरची ब्लू टिक मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरने ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा नवा पर्याय आणला होता. मात्र, त्याआधी ब्लू टिक मिळालेल्या म्हणजे जुन्या व्हेरिफाईट युजर्सची ब्लू टिक हटवण्यात आली नव्हती. आता कंपनीने आधी दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही.


एलॉन मस्क यांचा ट्विटर युजर्संना दणका


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवरील बनावट अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप ट्विटर ब्लू (Twitter Blue) चं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल 1 एप्रिल नंतर तुमच्या अकाऊंटवर फ्री ब्लू टिक हटवण्यात येईल.