iPhone 11 Discount : जर तुम्ही स्वस्तात आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आली आहे. आयफोन 11 वर मोठी सवलत मिळत आहे. आयफोन 11 2019 मध्ये लॉन्च झाला होता. त्यानंतर कंपनीने 6.1-इंच लिक्विड रेटिना HD LCD डिस्प्ले, कमाल ब्राइटनेस 625 nits आणि नॅनो सिम आणि eSIM साठी सपोर्ट दिला होता. iPhone 11 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 12MP प्रायमरी आणि 12MP सेकंडरी कॅमेरा समाविष्ट आहे. फोनच्या पुढील बाजूस 12MP सिंगल कॅमेरा आहे. या फोनवर जरी मोठा डिस्काउंट मिळत असला तरी 2023 मध्ये iPhone 11 खरेदी केला पाहिजे का? जाणून घेऊ...


iPhone 11 Discount : आयफोन 11 ची किंमत


iPhone 11 मध्ये A13 Bionic चिप देण्यात आली आहे, ज्यामध्ये 64GB आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट आहे. फोनमध्ये TouchID आणि FaceID दोन्ही सपोर्ट आहेत. फ्लिपकार्टवर iPhone 11 च्या बेस मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे. याचे 128GB मॉडेल 45,900 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे. हा फोन काळ्या, लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.


iPhone 11 Discount : आयफोन 11 वर सवलत


Flipkart वर iPhone 11 च्या बेस व्हेरिएंटवर 4901 रुपयांची सूट मिळत आहे, त्यानंतर त्याची किंमत 39,999 रुपये होईल. एवढेच नाही तर तुम्हाला HDFC बँकेच्या कार्ड्सवर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोनवर 27,000 रुपयांपर्यंत सूट आहे. त्यानुसार तुम्ही हा फोन फक्त 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.


iPhone 11 Discount : 2023 मध्ये आयफोन 11 खरेदी करणे योग्य आहे का?


 iPhone 12 2019 मध्ये लॉन्च झाला होता. आता iPhone 14 देखील लॉन्च झाला आहे. लेटेस्ट मॉडेलमध्ये असे अनेक फिचर्स आहेत, जे iPhone 11 मध्ये नाहीत. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार आयफोनचा पर्याय शोधत असाल तर स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. त्यात अजूनही अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे तो लोकप्रिय फोन बनतो. आपण नवीन तंत्रज्ञान आणि फीचर्स शोधत असल्यास, आपण नवीन मॉडेलचा विचार करू शकता.


सॅमसंग गॅलेक्सी S22 वर देखील डिस्काउंट उपलब्ध आहे


Samsung Galaxy S22 Amazon वर 57,990 रुपयांना लिस्ट झाला आहे, तर या स्मार्टफोनची मूळ किंमत 85,999 रुपये आहे. त्यानुसार फोनची किंमत 33% ने कमी करण्यात आली आहे. जर तुम्हालाही सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये रस असेल तर तुम्ही या स्मार्टफोनचाही विचार करू शकता.