Twitter new Logo Changed:  इलॉन मस्कने ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता इलॉन मस्क यांनी   ट्विटरचे  रंगरूप बदलले आहे.  ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली असून  आता इलॉन मस्क ट्विटरचा नवा लोगो  X आहे.

  


 






ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व


इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलली आहे.ट्विटरच्या बर्डची जागा X या लोगोने घेतली आहे. इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व आहे.


अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे.


अलीकडेच इलॉन मस्कने नवा नियम बनवला आहे, ज्याच्या अंतर्गत साइन इन न केलेले लोक ट्विट पाहू शकणार नाहीत. यापूर्वी, यूजर्सचे प्रोफाइल किंवा ट्विट पाहण्यासाठी ट्विटरवर खाते तयार करण्याची गरज नव्हती. मस्क यांनी या नियमाबाबत युक्तिवाद केला की ट्विटरमधून इतका डेटा येत आहे की सामान्य वापरकर्त्यांच्या सेवांवर नकारात्मक परिणाम होत आहे.


मस्क यांनी घेतला थ्रेड्सचा धसका


मेटा कंपनीने 5 जुलै रोजी थ्रेड्स ॲप लाँच केलं. या ॲपने अवघ्या काही दिवसांतच ट्विटरच्या युजर्सना भुरळ पाडली. यामुळे ट्विटरच्या युजर्समध्ये घट झाली आहे. एलॉन मस्क यांनी याचा धसका घेतला असून युजर्स ट्विटर सोडू नयेत यासाठी आता ट्विटरवर अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटर कंपनीने माहिती शेअर करत सांगितलं होतं की, ट्विटर जाहिरातींच्या कमाईचा काही भाग निर्मात्यांना शेअर करेल. अलीकडे, मस्कने ट्विट वाचण्याची मर्यादा आणि कमाई धोरण बदलले आहे जेणेकरून वापरकर्त्यांना अधिक फायदा मिळू शकेल. 


हे ही वाचा :                             


Twitter New Feature : LinkedIn प्रमाणे आता ट्विटरद्वारेही नोकरीची संधी, लवकरच येणार नवीन फिचर