Telegram New Features : सोशल मीडिया कंपनी टेलिग्रामने (Telegram) आपल्या अॅपमध्ये काही नवीन फीचर्स आणले आहेत. टेलिग्रामच्या 10.5.0 अपडेटमध्ये कंपनीने कॉलिंग इंटरफेस बदलला आहे, तसेच अॅपमधील मेसेज डिलीट करण्यासाठी बॉट्स अपग्रेड केले आहेत आणि थॅनोस अॅनिमेशन जोडले आहेत. या फिचरमुळे बॅटरी लाईफ सुधारते आणि कामदेखील फास्ट होते. या अपडेटमुळे Whatsapp ची डोकेदुखी वाढू शकते.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, हे टेलिग्रामचे 2023 चे दहावे अपडेट आहे. नव्या अपडेटमध्ये कंपनीने कॉलिंग इंटरफेस पूर्णपणे बदलला आहे. आता कॉलिंग दरम्यान बॅकग्राऊंड स्क्रीनवर तुम्हाला नव्या प्रकारचे अॅनिमेशन आणि इमोजी दिसेल. तसेच कॉलच्या स्टेटसनुसार ते बदलतील. उदाहरणार्थ, कॉल रिंगिंग मोडमध्ये असेल तर काही वेगळं अॅनिमेशन दिसेल, काही कॉल संपल्यावर बॅकग्राऊंड पुन्हा बदलेल. कंपनीने सांगितलंय की, नव्या अपडेटमध्ये कॉल क्वालिटी सुधारण्याचे कामही करण्यात आले आहे. वेबसाईटनुसार, टेलिग्राम या वर्षी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची क्वालिटी आणखी सुधारण्यासाठी नवीन अपडेट्स आणणार आहे. या अपडेट्सचीदेखील अनेकजण वाट बघत आहेत.
मेसेज डिलीट करताना थॅनोस इफेक्ट दिसेल!
गेल्या वर्षी टेलिग्रामने iOS अॅपमधील मेसेज ऑटो-डिलीट करण्यासाठी थानोस इफेक्ट जारी केला होता. आता कंपनीने अँड्रॉइड युजर्ससाठीही हा इफेक्ट आणला आहे. याशिवाय कंपनीने रिअॅक्ट, मॅनेज रिअॅक्शन कोट्स आणि लिंकफॉर बॉट्स देखील अपडेट केले आहेत.
बॅटरी ड्रेन होणार नाही
टेलिग्रामने दावा केला आहे की, नवीन अपडेटनंतर स्मार्टफोनच्या बॅटरी ड्रेनची समस्या दूर झाली आहे, म्हणजेच कॉलिंगदरम्यान बॅटरीचा वापर कमी होईल. याशिवाय अॅपचे अनेक प्रकारचे बगही दुरुस्त करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर टेलिग्रामच्या या अपडेटमुळे कॉल कनेक्शन आणि ऑडिओ क्वालिटीही सुधारण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपचं टेन्शन वाढणार!
टेलिग्रामच्या या नव्या फीचर्समुळे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे टेन्शन वाढू शकते. व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी कॉलिंग फीचर्समध्ये ही मोठी सुधारणा केली होती. मात्र, व्हॉट्सअॅप कॉलिंगदरम्यान टेलिग्रामसारखे अॅनिमेशन फीचर मिळत नाही. येत्या काळात व्हॉट्सअॅपमध्येही असे नवे फिचर्स पाहायला मिळू शकतात. सध्या टेलिग्रामपेक्षा Whatsapp वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे टेलिग्राम आता नव्या अपडेट्सवर काम करताना दिसता आहे. त्यातच Whatsapp सारखे काही फिचर्स येत्या काळात टेलिग्राममध्ये दिसण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-