Free Netflix : ओटीटी अॅपवर वेब सीरिज ( Netflix )आणि सिनेमांसह इतर व्हिडिओ कंटेंट पाहण्यासाठी युजर्सला खूप पैसे खर्च करावे लागतात. यासाठी प्रत्येक युजर एक असा मार्ग किंवा ऑफर शोधतो ज्याद्वारे त्यांना ओटीटी अॅप्स वापरण्याची आणि पैसे खर्च न करता वेब सीरिज पाहण्याची सुविधा मिळू शकते. जर तुम्ही जिओ किंवा एअरटेल कंपनीचे सिमकार्ड वापरत असाल तर आम्ही तुम्हाला एक असा मार्ग सांगतो ज्याद्वारे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही आणि तुम्ही सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या नेटफ्लिक्सचा वापर करू शकाल आणि नेटफ्लिक्सवरील सर्व चित्रपट आणि वेब सीरिज पूर्णपणे मोफत पाहू शकाल.
नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन (Netflix)
नेटफ्लिक्स भारत आणि जगभरातील देशांमध्ये बनलेल्या मजेदार चित्रपट आणि वेब सीरिजसाठी ओळखले जाते. हा ओटीटी प्लॅटफॉर्म भारतापासून अमेरिकेपर्यंत जगभरात खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे त्याचा वापर पूर्णपणे मोफत कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगतो. खरंतर, टेलिकॉम कंपन्या स्वत:च्या स्वतंत्र प्लॅनसह मोफत ओटीटी अॅप्स देतात. यात आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या काही नवीन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
जिओचा पहिला प्लॅन (jio)
रिलायन्स जिओच्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स अॅपसब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे. जिओचा पहिला प्लॅन 1099 रुपयांचा आहे. या प्लॅनसोबत युजर्संना नेटफ्लिक्स मोबाइलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. नेटफ्लिक्सव्यतिरिक्त युजर्संना 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते.
जिओचा दुसरा प्लॅन (Jio)
या लिस्टमध्ये जिओचा दुसरा प्लॅन 1499 रुपयांचा आहे. या प्लॅनसोबत युजर्संना नेटफ्लिक्सची फ्री सुविधाही मिळते. या प्लानमध्ये युजर्संना नेटफ्लिक्सचा मोबाइल प्लॅन नव्हे तर बेसिक प्लॅन मोफत वापरण्याची सुविधा मिळते. बेसिक प्लॅनची पिक्चर क्वालिटी मोबाइल प्लॅनपेक्षा थोडी चांगली आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह डेली 3 जीबी इंटरनेट, 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्वाड असे अनेक खास फिचर्स मिळतात.
एअरटेलचा एकमेव प्लॅन (Airtel)
या यादीत एअरटेलच्या एकमेव प्लानचाही समावेश आहे, ज्याची किंमत 1499 रुपये आहे. या प्लानसोबत युजर्संना नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लॅनचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. या प्लॅनमध्ये युजर्संना नेटफ्लिक्सव्यतिरिक्त 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. एअरटेलच्या या प्लॅनसोबत युजर्संना हॅलोट्यून्स, विंक म्युझिकचं फ्री फिचर्स मिळतं.