Honor X9b 5G Smartphone : Honor X9b हा नवीन स्मार्टफोन (Smartphone) भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, राउंड कॅमेरा सेटअप, मॅजिक ओएस 7.2 ऑपरेटिंग सिस्टम आहे. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तीन वर्ष वापरल्यानंतरही फोनची बॅटरी तशीच नवीन राहील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.


पॉवरफुल बॅटरीशिवाय, या Honor स्मार्टफोनमध्ये 108 MP चा प्रायमरी कॅमेरा आणि ग्राहकांसाठी उत्तम डिस्प्ले देण्यात आला आहे. Honor X9b खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि या फोनची विक्री कधी सुरू होईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


Honor X9b ची भारतात किंमत किती असेल?


या Honor मोबाईल फोनच्या 8 GB RAM / 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या हँडसेटसोबतच ग्राहकांना कंपनीकडून 699 रुपयांचा फ्री चार्जरही दिला जाणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री ग्राहकांसाठी ई-कॉमर्स साइट Amazon वर 16 फेब्रुवारी 2024 पासून म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता सुरू होईल.


लाँच ऑफर काय असेल? 




(Photo Credit : Amazon)


Amazon वर दिलेल्या माहितीनुसार, फोनवर 3,000 रुपयांची बँक ऑफर किंवा 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 699 रुपयांचा फ्री चार्जर, 2999 रुपयांचा Honor Protect प्लॅनचा लाभ दिला जाईल. ग्राहकांच्या सोयीसाठी, 6 महिन्यांपर्यंत व्याजमुक्त ईएमआयची सुविधा देखील असेल.


Honor X9b 5G चे डिटेल्स 


डिस्प्ले : या फोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.


चिपसेट : वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, 4nm वर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 1 प्रोसेसर या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आला आहे.


कॅमेरा सेटअप : मागील बाजूस 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर आहे जो मोशन कॅप्चर आणि 3x लॉसलेस झूमला सपोर्ट करतो. यासोबतच 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर उपलब्ध आहे.


बॅटरी क्षमता : या नवीनतम 5G स्मार्टफोनमध्ये 5800 mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे जी फोनमध्ये जीवन श्वास घेण्यास मदत करते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Samsung Galaxy : सॅमसंगच्या 'या' इअरबड्समध्ये Galaxy AI फीचर्सही आहेत; यूजर्सना नेमके कोणते फायदे मिळतील?