Xiaomi 14 Ultra : चीनी स्मार्टफोन ब्रँड Xiaomi हा येत्या काळात Xiaomi 14 Ultra भारतात लाँच करू शकतो.‌‌ जर हा फोन भारतात लाँच झाला तर तो IQOO 12, OnePlus 12 आणि अलीकडेच लाँच झालेल्या Vivo X100 Pro ला टक्कर देणारा असेल. मागील वर्षी Xiaomi 14 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरचा सपोर्ट सोबत हा 14 सीरीज अँड्रॉइड फोन लाँच केला होता. नवीन मॉडेलला या फ्लॅगशिप सीरिजचे टॉप मॉडेल म्हटलं जाऊ शकतं. या स्मार्टफोनला आधीच ECC आणि IMEI सर्टिफिकेशन  मिळाले आहे. त्यामुळे हा फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. 


Xiaomi 14 Ultra चे स्पेसिफिकेशन्स 


Xiaomi 14 Ultra भारतात Xiaomi 13 Ultra चा सक्सेसर असेल जो कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच केला होता. काही काळापूर्वी, X14 Ultra चा Geekbench स्कोअर शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 2,267 पॉईंट्स आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 6,850 पॉईंट्स  देण्यात आले होते. Xiaomi च्या या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm ची लेटेस्ट चिप मिळू शकते.


कॅमेरा फिचर्स कसे आहेत?


या फोनमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल असेल आणि तो अंडर डिस्प्ले फ्रंट कॅमेरासह येईल. या व्यतिरिक्त ते सॅटेलाइट कम्यूनिकेशन आणि उत्तम बायोमेट्रिक्ससाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर मिळवू शकते. याच बरोबर फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये चार 50MP कॅमेरे असू शकतात आणि मुख्य लेन्स Sony LYT 900 असू शकते. हे सगळे फिचरसध्या लिक झाले आहेत मात्र यापेक्षा वेगळे फिचर्स या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. 


Samsung Galaxy S24 Series ला टक्कर देणार?


कोरियन कंपनी सॅमसंगचा (Samsung) यंदाचा सर्वात मोठा इव्हेंट गॅलेक्सी अनपॅक्ड 2024 कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे 17 जानेवारीला होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोनव्यतिरिक्त AI अपडेट्स देणार आहे. लीकनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये आपले गॉस एआय टूल लाँच करू शकते. Samsung Galaxy S24 Series बद्दल  मोबाइल प्रेमींमध्ये उत्सुकता चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. यावेळी Samsung Galaxy S24 Series खूप खास असणार आहे कारण कंपनी AI फीचर्सला सपोर्ट करणार आहे. AIच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये लाइव्ह फोन कॉल ट्रान्सलेशनपासून फोटो एडिटपर्यंत अनेक गोष्टी करू शकाल. 


इतर महत्वाची बातमी-


स्वस्तात  iPhone हवाय? या मॉडेलवर मिळतोय डिस्काऊंट, 5 कलर ऑप्शन उपलब्ध