Hide locked chats : व्हॉट्सअॅपने काही काळापूर्वी  (WhatsApp Update)  चॅट लॉक फीचर भारतात लाईव्ह केले होते. याअंतर्गत तुम्ही तुमचे पर्सनल चॅट एका फोल्डरमध्ये लॉक करू शकता. लॉक केल्यानंतर ते फक्त फिंगरप्रिंटद्वारे उघडता येतात. मात्र, या फीचरची एक अडचण अशी होती. जर तुम्ही मोबाईलमध्ये एखाद्या मित्राचे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे फिंगरप्रिंट लॉक अॅड केले असेल तर ते तुमचे व्हॉट्सअॅप सीक्रेट चॅटही पाहू शकतात. ही समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन सीक्रेट कोड फीचर जारी केले आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॉक केलेल्या चॅटसाठी फिंगरप्रिंटव्यतिरिक्त वेगळा टेक्स्ट पासवर्ड सेट करू शकता.


लॉक केलेले फोल्डर कोणालाही दिसणार नाही...


नव्या अपडेटमध्ये कंपनीने युजर्सना एक फीचर दिले आहे. ते व्हॉट्सअॅपच्या सर्च बारमध्ये पासवर्ड टाकून आपले लॉक केलेले फोल्डर अॅक्सेस करू शकतात. म्हणजेच लॉक केलेले चॅट फोल्डर आत्तासारखे टॉपमध्ये दिसणार नाही. तुम्ही ते लपवू शकता. याशिवाय आता चॅट लॉक करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रोफाईलवर जाण्याची गरज नाही.


लॉक केलेलं फोल्डर कसं लपवाल?


तुमचे सिक्रेट चॅट लपवण्यासाठी तुम्हाला लॉक फोल्डरवर जावे लागते. येथे तुम्हाला उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील, त्यापैकी एक पर्याय असेल 'हाईड चॅट लॉक फोल्डर'. ते ऑन करताच तुमचे लॉक केलेले चॅट व्हॉट्सअॅपवरून गायब होतील. त्यांना अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला सर्च बारमध्ये तुमचा पासवर्ड टाकावा लागेल.


Last Seen सोबतच दिसणार Profile Information


व्हॉट्सअॅप आता नव्या रुपातदेखील दिसण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या काही बीटा टेस्टर्ससोबत उपलब्ध असलेल्या एका नवीन फीचरची चाचणी घेत आहे. खरं तर अँड्रॉइड युजर्ससाठी चॅट विंडोमध्ये लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दाखवण्याचं काम कंपनी करत आहे. म्हणजेच नव्या फीचरअंतर्गत तुम्हाला चॅट विंडोमध्ये युजरच्या लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसेल. हे फिचर येत्या काही दिवसातच सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. 


व्हॉट्सअॅपच्या नवनव्या गोष्टींवर किंवा फिचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या 'Wabetainfo' या वेबसाईटने हे अपडेट शेअर केले आहे. अँड्रॉइड बीटाच्या 2.23.25.11 व्हर्जनमध्ये हे नवे फीचर पाहायला मिळाले आहे. तुम्हालाही आधी कंपनीचे लेटेस्ट फीचर्स मिळवायचे असतील तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी करू शकता.


नव्या भन्नाट फिचर्सवर काम सुरु... 


व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. अलीकडच्या काळात कंपनीने शॉर्टकट बटण दिले आहेत, जे आपल्याला चॅटजीपीटी सारख्या AIच्या माध्यमातून चॅटबॉट्सशी संवाद साधू शकतात. ग्रुप संभाषणासाठी नवीन व्हॉइस चॅट, अँड्रॉइड आणि आयओएससाठी ईमेल व्हेरिफिकेशन यावरदेखी कंपनीचं काम सुरु आहे. येत्या काळात व्हॉट्सअॅप आपल्याला नवनव्या फिचर्स सोबत मिळणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


How To Clean Laptop Keyboard : एका टॉयलेट सीटवर जेवढे जंतू असतील, तेवढेच तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर असतात; लगेच स्वच्छ करा, नाहीतर...