Spam Call: स्पॅम कॉल्स आणि कंपन्यांच्या निनावी फोनकॉल्समुळे तुम्हीही त्रासला आहात का? अशा कॉल्सला नियंत्रणात ठेवण्यासाठी टेली कम्यूनिकेशनमधील अशा कॉल्सला नियंत्रित करणारी ट्राय म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही संस्था रजिस्टर नसलेल्या अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यासह स्पॅम कॉल्सपासून होणाऱ्या फसवणूकीवर नियंत्रण ठेवते. याच प्राधिकरणानं टेलिकॉम कंपन्यांच्या स्पॅम कॉल्स आणि एसएमएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम दिले आहेत. यावर टेलिकॉम कंपन्या काय म्हणतात? काय आहेत हे नियम? वाचा.
स्पॅम कॉल कसा ठरवला जातो?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कॉलसाठी नंबरची 140 मालिका अनिवार्य केली आहे. त्यानुसार दहा अंकी मोबाईल नंबर वरून आलेले स्पॅम कॉल आणि एसएमएस ही समस्या आर्थिक फसवणुकीला कारणीभूत ठरते. या नियमानुसार विशिष्ट संख्येच्या पलीकडे केलेल्या एसएमएस आणि व्हॉइस कॉलसाठी दंड आकारला जातो. दररोज 50 पेक्षा अधिक कॉल करणारे किंवा अधिक एसएमएस पाठवणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना कॉलर म्हणून पाहिले जावे असा Trai चा प्रस्ताव आहे.
OTP, URL याबाबत काय आहे नियम?
अलीकडेच त्यांनी दूरसंचार कंपन्यांना प्रचारात्मक हेतूंसाठी पाठवलेल्या एसएमएसमध्ये फक्त व्हाइटलिस्ट केलेल्या URL/ APK/OTT लिंकना परवानगी देण्यास सांगितले. याची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर आहे. स्पॅम कॉल ओळखण्यासाठी शोधण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासह एआय आधारित अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन हे शोध प्रणाली वापरण्याचे मार्ग शोधण्याचा ट्राय प्रयत्न करत आहे. प्रमोशनल कम्युनिकेशन साठी वापरकर्त्यांची स्पष्ट संमती अनिवार्य करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण स्पॅम कॉल थांबवण्यासाठी सक्रिय कृती आणि उल्लंघन केले तर दंड यावर देखील ट्राय विचार करत असल्याचे सांगण्यात आले.
दंडात्मक कारवाई
ट्राय ना असं प्रस्तावित केलंय की डायलर किंवा रोबोट कॉल वापरण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना आगाऊ माहिती तसेच वापरकर्त्यांची संमती घेणं आवश्यक आहे. अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना प्रचारात्मक हेतूसाठी पाठवलेला एसएमएस मध्ये फक्त व्हाईट लिस्ट केलेल्या कंपन्यांना युआरएल एपीके आणि ओटीपी लिंक्स ला परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे. ट्रायच्या नियमानुसार जर टेलिकॉम ऑपरेटर नोंदणी न केलेल्या प्रेषकांविरुद्ध कारवाई करण्यात अयशस्वी ठरले आहेत, तर प्रेषक टेलिकॉम ग्राहकांच्या वैयक्तिक श्रेणीतील असल्यास त्यांना प्रति उदाहरण 10,000 रुपये आणि प्रति 1 लाख रुपये द्यावे लागतील.
टेलिकॉम कंपन्या काय म्हणतात?
TRAI च्या नियमांवर टेलिकॉम कंपन्यांची मुख्य अडचण एवढीच आहे की मोबाईल वापर करताना वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी संबंधित संदेश प्राप्त होण्यास या नियमांमुळे उशीर होऊ शकतो. कारण कोणताही संदेश पाठवण्यापूर्वी एसएमएस मधील सामग्रीची टेल्कोकडे नोंदणी करावी लागेल. उद्योग अधिकाऱ्यांच्या मते हे ओटीपी आणि एसएमएस मधील इतर लिंक रियल टाईम मध्ये तयार होतात त्या टेल्को मध्ये नोंदणीकृत होऊ शकत नाहीत.