Apple: ॲपल कंपनी जेव्हा-जेव्हा नवा फोन लॉन्च करते, तेव्हा-तेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडते. आता ही कंपनी येत्या 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार आहे. आयफोन 16 (iphone 16) मध्ये नेमकं काय असणार? याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. या फोनला लॉन्च होण्यसाठी काही दिवसांचा अवधी आहे. मात्र हा फोन किती रुपयांना मिळणार? त्यातले फिचर्स काय असतील? हे सामान्यांना जाणून घ्यायचे आहे.
आयफोन हे फार महागडे असतात. एका सामन्या माणसाला हे फोन घेणे परवडत नाही. अशा स्थितीत आयफोन 16 ची किंमत नेमकी किती असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या आयफोनची प्रत्येक देशात वेगवेगळी किंमत असेल. त्या-त्या देशातील करप्रणालीनुसार या फोनच्या किमतीत बदल होतो.
आयफोन 16 जपानमध्ये सर्वांत स्वस्त मिळणार (iPhone 16 Latest Price)
जपानमध्ये आयफोनची किंमत सर्वांत कमी असते. त्यामुळे या देशात iPhone 16 ची किंमतदेखील सर्वांत कमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जपानमध्ये कर तसेच अन्य सेवा शुल्क कमी घेतले जाते. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत जपानमध्ये iPhone 16 साधारण 17.9 टक्क्यांनी स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. जपानमध्ये iPhone 16 ची किंमत साधारण 70,705 रुपये असण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत ही किंमत फारच कमी आहे.
अमेरिकेतही मिळणार स्वस्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेतही आयफोन 16 स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आयफोन 16 साधारण 799 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 67,106 रुपयांना विकला जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अमेरिकेत जपानपेक्षाही कमी किमतीत आयफोन 16 विकला जाईल.
दुबईतही मिळतो स्वस्त आयफोन
दुबईतही आयफोनची किंमत कमी असते. आयफोन खरेदी करण्यासाठी तिसरा सर्वांत चांगला पर्याय हा दुबाई आहे. येथे आयफोन 16 ची किंमत 872 USD म्हणजेच साधारण 73,237 रुपये असण्याची शक्यता आहे.
भारतात किती रुपयांना मिळणार? (iPhone 16 price in India)
भारतात आयफोन 16 ची किंमत साधारण 963 USD म्हणजेच साधारण 80,000 रुपये असण्याची शक्यता हे. चीनमध्ये याच फोनची किंमत 983 यूएस डॉलर्स म्हणजेच साधारण 82,560 रुपये असू शकते.
हेही वाचा :
खुशखबर! आयफोन 15 प्लसवर तब्बल 19 हजारांची सूट, वाचा ऑफरबद्दल A टू Z माहिती
iPhone 15 : आयफोन 15 वर नऊ हजारांची सूट, फायदा घेण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या संपूर्ण महिती