AI Voice Scam : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI (Artificial Intelligence) ने 2023 मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.. चॅटजीपीटी, बार्ड आणि जेमिनी आय या AI टूल्सने सगळ्यांचं काम सोपं केलं. प्रत्येकच क्षेत्रात AI चा वापर चांगलाच वाढताना दिसत आहे. रोज आपल्याला AI टूलचा (AI Voice Scam) वापर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करावा लागत आहे. एकीकडे कामाचा वेग वाढत आहे पण दुसरीकडे धोकाही वाढताना दिसत आहे. 


AI चे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. मात्र AI च्या फायद्यांंची कमी आणि धोक्यांची चर्चा जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. त्यात सगळ्यात जास्त धोका हा एआय व्हॉईस स्कॅम किंवा एआय व्हॉईस फ्रॉडमध्ये दिसून येत आहे. AI Voice Scam चा धोका असलेली अनेक प्रकरणं समोर आली आहेत, दोन ते तीन दिवसांपूर्वी लखनऊ शहरात असाच एक प्रकार समोर आला होता. त्यात लखनऊमधील एका व्यक्तीची 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्याआधी एका माहिलेची देखील फसवणूक करण्याच आल्याचं समोर आलं होतं. 


असा करतात Scam!


AI व्हॉईस घोटाळा म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, लखनऊ प्रकरण पाहिलं तर, पीडितेला एका सायबर गुन्हेगाराने नातेवाईक म्हणून फोन केला. गुन्हेगाराने  नातेवाईकाच्या आवाजात AI च्या मदतीने त्या व्यक्तीशी संवाद साधला. 90 हजार रुपये कुणाला तरी पाठवायचे होते, पण पैसे मिळत नसल्याचे त्याने पीडितेला सांगितलं. नातेवाईक समजून पीडितेने दिलेल्या नंबरवर पैसे पाठवले. सुदैवाने अर्धं पेमेंट फेल गेल्याने तिला 90 हजारांऐवजी 44 हजार 500 रुपये गमवावे लागले.


व्हिडिओ कॉलचेही अनेक Scam!


AI व्हॉईस घोटाळ्यांप्रमाणेच व्हिडिओ कॉल घोटाळेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये गुन्हेगार डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना ओळखीचे म्हणून व्हिडिओ कॉल करतात आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पेमेंट करायला सांगतात. अनेकदा डीपफेकवरून अश्लील फोटो किंवा व्हिडिओ बनवून लोकांना ब्लॅकमेल केले जाते.


खरं आणि खोटं नेमकं काय आहे?


आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एआय व्हॉईस स्कॅम, डीपफेक व्हिडिओ स्कॅम इत्यादींपासून स्वत:ला वाचवणे गरजेचं आहे. यासाठी आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण एआय आणि डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाने खरं आणि खोटं नेमकं काय आहे हे कळणं कठीण झालं आहे. अगदी समजूतदार लोकही त्यांना पकडू शकत नाहीत आणि फसवणुकीला बळी पडतात.


'ही' सावधगिरी नक्की बाळगा!



  • अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉलला उत्तर देताना सावधगिरी बाळगा.

  • जर कोणी तुमची ओळख झाली आणि अनोळखी नंबरवरून फोन केला तर आधी त्याची पडताळणी करा.

  • फसवणूक करणारे अनेकदा तातडीच्या, तात्काळ, सध्याच्या गरजांसाठी निमित्त देतात, म्हणून त्यांच्यापासून सावध राहा.

  • संशयास्पद मेसेज किंवा ईमेलमध्ये पाठविलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.

  • अनोळखी ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करणे टाळा.

  • आपल्या बँक किंवा कार्डशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नका.

  • काही संशयास्पद वाटल्यास ताबडतोब बँकेत/पोलिसांकडे तक्रार करावी.


इतर महत्वाची बातमी-


Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर