Swiggy Update: सध्या बहुतांश जणांना बदलत्या लाईफस्टाईलमध्ये स्वत: ला सामावून घेतल्याशिवाय पर्याय नसतो. विशेषत: तुम्ही शहरात राहत असला, तर शहरी लाईफस्टाईलशी स्वत: जुळवून घ्यावं लागतं. तुम्ही एखादया कंपनीत कामाला असाल, तर वेळेत ऑफिसला जाणं गरजेचं असतं. पण सगळ्यामध्ये घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर प्रवास करून प्रचंड धावपळ होते. यामुळे थकवा येतो आणि जेवण बनवण्याची इच्छा राहत नाही. अशावेळी इतर पर्यायांचा शोध घेतला जातो. शहरात जेवण मागवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यासाठी घरी बसून आपल्या आवडीची डिश Swiggy आणि Zomato सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्मवरून मागवण्याची सुविधा उपलब्धही उपलब्ध आहे. तुमच्यातील सर्वांनी कधी ना कधी Swiggy वरून जेवण ऑर्डर केलं असणार. पण आता स्विगीवरून जेवण ऑर्डर करणं महाग पडू शकतं. कारण स्विगीनं काही शहरात जेवण ऑर्डरवर चार्जेस वाढवले आहेत. हे चार्जेस नेमकं किती वाढवले? जेवण किती महाग पडू शकत? हे जाणून घेऊया...
प्रत्येक ऑर्डरमागे इतका चार्ज द्यावा लागणार
कंपनीने प्रत्येक ऑर्डरमागे दोन रूपये इतका एक्स्ट्रा चार्ज लागू केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्लॅटफाॅर्म दोन रूपये द्यावे लागतील. सध्या हे बंगळूरू आणि हैदराबाद शहरातील ग्राहकांना हे चार्जेस लागू पडणार आहेत. या शहारात राहणाऱ्या ग्राहाकांनी कितीही जेवण ऑर्डर केलं, तर प्रत्येक ऑर्डरमागे दोन रूपये एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागणार आहे. या चार्जेसच्या बदल्यात कंपनी ग्राहकांना चांगली सेवा प्रधान करण्यावर भर देणार आहे. यामुळे पूर्वीपेक्षा चांगली सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. मुंबई आणि दिल्ली शहरात अद्याप सेवा शुल्क वाढवले नाही. परंतु, लवकरच देशातील बहुतेक सर्व शहरात कंपनी चार्जेस लागू करू शकते.
या जेवणाच्या ऑर्डर्सवर एक्स्ट्रा चार्ज नाहीत
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना फक्त फूड आयटम्सवर दोन रूपये चार्ज द्यावं लागणार आहे. Swiggy Instamart वर हे चार्जेस लागू नाहीत. स्विगी दिवसाला देशभरातून 20 लाखपेक्षा जास्त ऑर्डर सप्लाय करत असते. दरम्यान रमजान महिन्यात हैद्राबाद शहरातील लोकांनी 10 लाख बिर्याणी आणि 4 लाख प्लेट हलीम ऑर्डर केलं होतं. गेल्या महिन्यात कंपनीने सांगितल्यानुसार, स्विगीने गेल्यावर्षी 33 मिलियन इडलीच्या डिश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे.
स्विगीने 380 कर्मचाऱ्यांना काढलं होतं कामारून
यावर्षीच्या सुरूवातीला कंपनीच्या सीईओने जवळपास 380 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. कंपनीच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचं कंपनीनेच सांगितले होतं. त्यामुळे आता हे नवीन एक्स्टा चार्ज लागू केल्यामुळे कंपनी मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.