Vivo T3 5G Smartphone Launched : विवो (Vivo) मोबाईल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Vivo ने भारतात Vivo T3 5G या मॉडेलचा नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर (Social Media) या स्मार्टफोनच्या संदर्भात चर्चा सुरु होती. आता ही ग्राहकांची ही प्रतीक्षा संपली असून तुमच्या आजूबाजूच्या स्टोअरवर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन मिडरेंज प्राईस सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 


Vivo चा नवा स्मार्टफोन 


नुकत्याच लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. पहिला व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 21,999 रुपये आहे.


या स्मार्टफोनचा पहिला सेल 27 मार्च रोजी Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाईटवर होईल. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेकडून पेमेंट करून हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या युजर्सना 2000 रुपयांची सवलत दिली जाईल. याशिवाय यूजर्सना या फोनवर 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन महिन्यांचा नो कॉस्ट EMI देखील दिला जातोय. कंपनीने हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल फ्लेक या दोन कलरमध्ये लॉन्च केला आहे.  


या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स (Vivo T3 5G Specifications) 


विवो स्मार्टफोनच्या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या फोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 7200 5G चिपसेट वापरला आहे.


कॅमेरा 


या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह 50MP Sony IMX822 सेन्सरसह येतो, ज्यामध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, 2x पोर्ट्रेट झूम आणि सुपर नाईट मोड समाविष्ट असलेल्या अनेक खास कॅमेरा वैशिष्ट्यांसह येतो. या फोनमध्ये 2MP लेन्स आणि फ्लिकर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगच्या सोयीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. 


या सर्वांशिवाय कंपनीने या फोनमधील बॅटरी सेटअपचीही विशेष काळजी घेतली आहे. या फोनमध्ये यूजर्सना 5000mAh बॅटरी आणि 44W फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 OS वर चालतो.


महत्त्वाच्या बातम्या :


Infinix Smart 8 HD 9 हजारांचा फोन आता फक्त 1300 रुपयांत; पैसे वाचवण्यासाठी काय करावं लागेल?