Vijay Sales Apple Days Sale : भारतात ऍपलच्या प्रोडक्ट्सचे अनेक चाहते आहेत. आयफोन (iPhone) असो किंवा मॅकबुक (MacBook), त्यांची मागणी खूप वाढली आहे. तेव्हापासून ई-कॉमर्स साईट्स यावर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. सध्या विजय सेल्सने ऍपल डे सेल सुरु आहे. 16 मार्चपासून हा सेल सुरु झालेला असून 24 मार्चपर्यंत ग्राहकांना या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेलमध्ये स्टोअरमध्ये आणि ऑनलाईन अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. सेल दरम्यान, तुम्हाला iPhone, MacBook, iPad, Apple Watch पासून AirPods आणि Apple Care+ पर्यंत सर्व गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. 


स्वस्तात आयफोन 15 प्रो मॉडेल खरेदी करा




ज्या ग्राहकांकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड आहे त्यांना या गॅजेट्सवर 5,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. याशिवाय, ग्राहक विजय सेल्स आउटलेटवर 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस घेऊ शकतात. टेकप्रेमींना या सेलचा भरपूर फायदा मिळू शकतो, ते कमी किंमतीत स्वतःला iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये अपग्रेड करू शकतात. 


सेल दरम्यान, विजय सेल्स आयफोन 15 प्रो सीरीजचे उच्च स्टोरेज मॉडेल्स बेस मॉडेल्सच्या समान किंमतीत विकत आहे. सेल दरम्यान iPhone 15 ची किंमत 66,490 रुपये आणि iPhone 15 Plus ची किंमत 75,820 रुपये आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सवर कंपनी 4,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. 


iPad आणि MacBook वर दमदार ऑफर 


कंपनी 24 मार्चपर्यंत iPad आणि MacBook वर ही चांगली सूट देत आहे. यूजर्स 9th Gen iPad 25,000 ते 70,770 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ज्या ग्राहकांकडे एचडीएफसी बँकेचे कार्ड (HDFC Bank Card) आहे त्यांना या गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळू शकते. 


मॅकबुक 74,900 रुपयांच्या रेंजमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये M1 चिपसेट आहे. यावर, तुम्हाला HDFC बँक कार्डच्या मदतीने 5,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.


Accessories आणि Loyalty Rewards मिळतील


डिव्हाईसेसच्या व्यतिरिक्त, ग्राहक चार्जर्स, केसेस, केबल्स, पेन्सिल यांसारख्या विविध ॲक्सेसरीज सवलतीत खरेदी करू शकतात. याशिवाय, निष्ठावंत संरक्षक MyVs लॉयल प्रोग्राम अंतर्गत लाभ घेऊ शकतात. त्यांना खरेदीच्या वेळी 0.75% लॉयल्टी पॉइंट्स मिळतील, जे ग्राहक विजय सेल्स स्टोअरमध्ये रिडीम करू शकतात. तरी, ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Google Drive News : Google अलर्ट! कोट्यवधी यूजर्सना पोहोचू शकतो धोका; चुकूनही 'या' चुका करू नका