Oneplus New Mobile : सध्या बाजारात अॅन्ड्रॉइड फोनचे नवनवीन व्हर्जन लाँच होत आहेत. त्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईलमध्ये नवनवीन फिचर्सची भर घातली जाते. चीनी स्मार्टफोन कंपनी वन प्लसने ( Oneplus) नुकतंच CE3 Lite 5G हा नवीन मोबाईल बाजारात लाँच केला आहे. त्यामुळे बजेट फ्रेंडली मोबाईलच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर असणार आहे. या मोबाईलशिवाय कंपनीने Nord Buds2 लाँच केला आहे.  Oneplus च्या नवीन प्रोडक्ट्सच्या वेगवेगळ्या भन्नाट फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया...


One plus Nord C3 light 5G - 


One plus Nord C3 light 5G हा नवीन अॅन्डॉइड सिस्टम असणारा मोबाईल आहे.  यासाठी कंपनीने ग्राहकांचा खास विचार केला आहे. यामध्ये ग्राहकांना 6.72 इतक्या इंचचा Amoled स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 120hzच्या रिफ्रेश रेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना हाय क्वालिटी फोटोचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी कंपनीकडून दोन स्टोरेज पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये 8GB रॅम आणि 128GB मेमरी,    8GB रॅम   आणि   256GBची एक्सपांडेबल मेमरी देण्यात आल्यामुळे उच्च स्टोरेज क्षमतेच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  


ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी बेसिक फोटोग्राफी शिकण्याठी हा मोबाईल फोन चांगला पर्याय ठरू शकतो.  यामध्ये  108 मेगापिक्सलची क्षमता असणारा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mah इतकी  शक्तिशाली  बॅटरीची क्षमता उपलब्ध करुन देण्यात आली असून अवघ्या 30 मिनीटात 100 टक्के चार्जिंग करता येणार आहे.  कंपनीने ग्राहकांचे लक्ष वेधू घेण्यासाठी फोन दोन रंगात उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे अशा दोन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. यावरून कंपनीने ग्राहकांची आवड समोर ठेवून फोनमध्ये बदल केल्याचं दिसून येतंय.


One plus Nord Buds 2 


नवीन मोबाईल फोनबरोबर कंपनीकडून वायरलेस One plus Nord Buds2 लाँच करण्याल आला आहे. यामध्ये दर्जेदार ऑडिओचा फील घेण्यासाठी ऑडिओची बेस क्षमता वाढविण्यात आली असून ग्राहकांना नॉइज कॅन्सलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच हे ऐअर बड्स ड्युएल ड्राईव्हसोबत (Dual Drive) येणार असून त्यामुळे ग्राहकांना गाणी, संगीत ऐकताना हाय क्वालिटीचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे One plus Nord Buds2 चा दर्जा सर्वोत्तम कसा राहिल, याकडे कंपनीने खास लक्ष दिलेले आहे.  


कोणताही मोबाईल फोन त्याच्या शक्तिशाली प्रोसेसरमुळे ओळखला जातो, त्याप्रमाणे ड्युएल ड्राईव्हच्या क्षमतेवरून (Dual Drive) ऐअर बड्स शक्तिशाली आणि दर्जेदार असल्याचे सिद्ध होतंय. हा बड्स ग्राहकांना 5000 रूपयापर्यंत उपलब्ध होणार आहे. सामान्यत: बाजारात दर्जेदार बड्स  खूप महागडे पहायला मिळतात. पण कंपनीने ग्राहकांचा विचार करून बजेट फ्रेंडली बड्स लाँच केला आहे. त्यामुळे वन प्लसचे उत्पादन ग्राहकांसाठी किफायशीर किमतीत उपलब्ध होत आहेत.


तसेच One plusकडून बाजारात आणखीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारी असून रेडमी नोट 12 या  नवीन स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड व्हर्जन असणार असल्याचे समजतेय.  POCO F5 असे या  स्मार्टफोनचे नाव असून हा स्मार्टफोनही त्याच्या दर्जेदार फिचर्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरतो का हे प्रत्यक्ष लाँच झाल्यानंतरच समजू शकेल.  हा स्मार्टफोन नेमकं कोणत्या तारखेला लाँच  होणार आहे हे कंपनीकडून अद्याप कळलेले नाही.


ही बातमी वाचा: