Samsung Galaxy M34 5G : अँड्रॉईड स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Sansung) आपला नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा नवीन स्मार्टफोन बेजट फ्रेंडली असून अनेक भन्नाट फीचरसह उपलब्ध होऊ शकतो. Samsung Galaxy M34 5G या सीरिजचा स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अमेझॉनवर टीज करायला सुरुवातही केली आहे. यामुळे हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. हा M सीरिजचा स्मार्टफोन असून जुलै महिन्यात लाँच होऊ शकतो, असं समजतंय. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी आणि ट्रिपल सेटअप LED लाईट कॅमेराही मिळणार आहे. यासोबत कंपनीने फोनच्या सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनरचा पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर अभिषेक यादवने Samsung Galaxy M34 5G या सीरिजच्या फोनची माहिती शेअर केली आहे. या बेजटफ्रेंडली स्मार्टफोनच्या फीचर्स, किंमत आणि लाँचिक डेटविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...


Samsung Galaxy M34 5G  स्मार्टफोनमधील स्पेसिफिकेशन्स 


प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर अभिषेक यादवच्या म्हणण्यानुसार, Samsung Galaxy M34 5G  या स्मार्टफोनमध्ये  6.6 इंच इतका FHD+ sAmoled  डिस्प्ले असून 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे.  
Samsung Galaxy M34 5G मध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट उपलब्ध असणार आहे. 
Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन अँड्रॉईड 13 च्या सिस्टीमला सपोर्टेड आहे.  
Samsung Galaxy M34 5G मध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy M34 5G मध्ये फोटोग्राफीसाठी 48MP+8MP+5MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट साईडला सेल्फी कॅमेरा आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13Mp  कॅमेरा मिळू शकतो.


या M सीरिजमधील सर्व स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आहेत. कंपनी हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किमतीत लाँच करणार आहे. या फोनची किंमत 20,000 हजार रुपयांच्या जवळपास असू शकतो. परंतु, या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. यासाठी सॅमसंगच्या युजर्सना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 


3 जुलै रोजी लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन 


3 जुलै 2023 रोजी मोटोरोला भारतात Motorola Razr 40 सीरिजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सीरिजमधील 2 स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये Motorola Razr 40 आणि  40 Ultra या सीरिजचा समावेश आहे. मोटोरोलाने दावा केल्यानुसार, या सीरिजमधील सर्वात स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठा कव्हर डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. 


 इतर महत्वाच्या बातम्या वाचा :


Samsung Galaxy M14 5G : सॅमसंगने वर्षातील पहिला M सीरीज स्मार्टफोन केला लॉन्च; मिळणार 6000mAh ची दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत