iPhone Discount and Offer : अलिकडे तरुणाईपासून वयस्कर व्यक्तींमध्ये आयफोनची (iPhone) क्रेझ पाहायला मिळत आहे. तुम्हांलाही आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर, ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. iPhone 12, 13 आणि 14 Pro वर भन्नाट ऑफर सुरु असून चांगलं डिस्काऊंटही देण्यात येत आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट (Flipkart) पर iPhone आणि अँड्रॉईड स्मार्टफोनवर (Android Smartphone) बंपर ऑफर सुरु आहे.


iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी


तुम्ही iPhone घेण्याच्या विचारात असाल तर, सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आयफोन खरेदी करताना आता तुम्ही हजारो रुपयांची बचत करु शकता. ॲपल कंपनीच्या iPhone 13, iPhone 14 Pro Max, iPhone 12 सह इतर मॉडेलवर कंपनीकडून भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट वरून तुम्ही स्वस्तात आयफोन खरेदी करु शकता.


iPhone 13 आणि iPhone 14 Pro वर दमदार सूट


iPhone 13 फ्लिपकार्टवर 58,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने (ICICI Credit Card) पैसे देऊन फोन विकत घेतल्यास, तुम्ही हा फोन 57,499 रुपयांना खरेदी करु शकता. जर तुम्ही 1 लाखांपेक्षा जास्त खर्च करू शकत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर 1,19,999 रुपयांना iPhone 14 Pro खरेदी करू शकता. हा फोन कंपनीने 1,29,900 रुपयांना लॉन्च केला होता. म्हणजेच तुम्ही थेट 9,901 रुपये वाचवू शकता. याशिवाय क्रेडिट कार्डवर स्वतंत्रपणे 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे, त्यानंतर तुमचा iPhone 14 Pro तुम्ही 1,16,999 रुपयांना खरेदी करु शकता.


फ्लिपकार्टवर iPhone वर भन्नाट ऑफर


तुम्ही फ्लिपकार्टवर iPhone 14 Pro Max 1,27,999 रुपयांना खरेदी करू शकता. ॲपल कंपनीने iPhone 14 Pro Max हा 1,39,900 रुपयांना लॉन्च केला होता. ॲपलचा सध्याचा हा सर्वात महागडा फोन आहे. हा तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. Apple लवकरच iPhone 15 सीरीज लॉन्च करणार आहे, ही सीरीज महाग असून शकते. त्यामुळे आयफोनचे जुने मॉडेल आता स्वस्तात खरेदी करणे हा योग्य निर्णय आहे.


Android च्या बजेटमध्ये iPhone 11


तुमचे बजेट 40,000 रुपये असेल तर तुम्ही iPhone 11 खरेदी करू शकता. iPhone 11 फ्लिपकार्टवर 39,749 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही iPhone 12 हा 53,999 रुपयांना आणि iPhone 14 Plus 79,999 रुपयांना खरेदी करू शकता. काही आयफोन मॉडेल्सवर बँक ऑफरचा फायदाही दिला जात आहे, त्यानंतर त्यांची किंमत आणखी कमी होईल.


पुढील महिन्यात 'हे' स्मार्टफोन लाँच होणार


दरम्यान, पुढील महिन्यात काही दमदार स्मार्टफोन लाँच होणार आहेत. मोटोरोला रेजर 40 (Motorola Razr 40) आणि मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा (Motorola Razr 40 Ultra), iQOO Neo 7 Pro, Nothing Phone 2, Samsung Galaxy M34, OnePlus Nord 3 आणि Nord CE 3 आणि Realme Narzo 60 सीरीज पुढील महिन्यात लॉन्च होणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Apple Pay : iPhone युजर्ससाठी खुशखबर! ॲपल स्वत:चं वेगळं पेमेंट ॲप लाँच करणार; Gpay, Phonepe आणि Paytm ला टक्कर