Samsung Smartphone : जर तुम्हाला सॅमसंगचे स्मार्टफोन (Samsung Smartphone) आवडत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग कंपनीने सॅमसंगची मोठी बॅटरी डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना या प्रसंगी बार्गेन डीलचा चांगला लाभ घेता येईल. आता सॅमसंगचा नेमका कोणता स्मार्टफोन स्वस्त झाला आहे? तसेच, तुम्ही तो किती रूपयांत खरेदी करू शकता? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कोणता फोन स्वस्त झाला?


खरंतर, Samsung Galaxy F54  कंपनीने गेल्या वर्षीच भारतीय ग्राहकांसाठी हा फोन लॉन्च केला होता. त्या दरम्यान हा स्मार्टफोन 30 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. फोनची किरकोळ किंमत 29,999 रुपये होती.


आता तुम्ही 'इतक्या' रुपयांत खरेदी करू शकता


Samsung Galaxy F54 5G
लॉन्चची किंमत – 29,999 रुपये
डिस्काउंट-5000 रुपये
नवीन किंमत – 24,999 रुपये
तुम्ही आता हा Samsung फोन 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह 24,999 रुपयांना खरेदी करू शकता.


बँक ऑफर काय आहे?



  • एचडीएफसी बँक कार्डसह, वापरकर्ते फोनवर अतिरिक्त 1000 रुपये वाचवू शकतात.

  • सॅमसंग ॲक्सिस बँक सिग्नेचर क्रेडिट कार्डसह, यूजर्स फोनवर 2500 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

  • Samsung Axis Bank Infinite क्रेडिट कार्डसह, यूजर्स मोबाईलवर 5000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.


Samsung Galaxy F54 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय आहेत?


डिस्प्ले- हा सॅमसंग फोन 6.7 इंच स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि AMOLED पॅनेलसह येतो. कंपनीचा हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येतो. तथापि, फोन प्री-अप्लाईड स्क्रीन प्रोटेक्टरसह येत नाही.


प्रोसेसर - हा सॅमसंग फोन Exynos 1380 चिपसेट सह आणला होता.


कॅमेरा - फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy F54 हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप 108MP+8MP+2MP सह येतो. सेल्फीसाठी फोन 32MP सेन्सरसह येतो.


बॅटरी - बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोन 6,000mAh बॅटरीसह येतो. मोठ्या बॅटरीसह फोन एका दिवसापेक्षा जास्त काळ वापरला जाऊ शकतो. फोन 25W फास्ट चार्जिंग फीचरसह येतो.


OS – हा Samsung फोन Android 13 OS सह येतो.


कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्टफोन 4 वर्षांच्या Android OS अपग्रेड आणि 5 वर्षांच्या सुरक्षा पॅचसह येतो.


महत्त्वाच्या बातम्या :


Vivo Y200e 5G Launch : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Vivo चा नवीन स्मार्टफोन लॉन्च; किंमत माहितीये?