Samsung 200MP Image Sensor: सोशल मीडियामुळे (Social Media) जगभरात फोटो आणि व्हिडीओची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच स्मार्टफोन कंपन्याही चांगल्यातले चांगले कॅमेरे बाजारात आणण्यासाठी काम करत आहेत. यातच आता सॅमसंगने (Samsung) आपला नवीन 200 मेगापिक्सेल इमेज सेन्सर ISOCELL HP2 सादर केला आहे. याशिवाय Apple ने आपली नवीन M2 चिप देखील जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली आहे. M2 Pro आणि M2 Max M2 दोन चिपसेटसह येतात. मात्र या बातमीत आपण सॅमसंगच्या (Samsung सेन्सरची माहिती जाणून घेणार आहोत. सॅमसंगचा (Samsung) हा नवीन सेन्सर प्रीमियम स्मार्टफोनमध्ये हाय रिझोल्यूशनचे उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यात मदत करतो. सॅमसंगने इमेज सेन्सर (Samsung 200MP Image Sensor) लॉन्च केला असला तरी अद्याप तो बाजारात उपलब्ध झालेला नाही. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Samsung 200MP Image Sensor: लवकरच बाजारात होणार उपलब्ध


कंपनीने म्हटले आहे की, या नवीन 200-मेगापिक्सेल इमेज सेन्सरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले आहे. लवकरच हे बाजारात उपलब्ध केले जाईल.


Samsung 200MP Image Sensor: कमी प्रकाशातही फोटो डिटेलिंग मिळणार जबरदस्त 


कंपनीने दावा केला आहे की, सॅमसंग (Samsung) 200 मेगापिक्सेल इमेज सेन्सर मॅक्सिमम पिक्सेल परफॉर्मन्स सुधारेल, जे कमी प्रकाशातही फोटो डिटेलिंग क्लिक कॅप्चर करेल. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, हा 200 एमपी इमेज सेन्सर 200 मिलियन 0.6 मायक्रोमीटर पिक्सेलसह सादर केला गेला आहे. हा सेन्सर यूजर्सला नवीन हाय-एंड स्मार्टफोनमध्ये मोठ्या कॅमेरा बंपरशिवाय हाय-रिझोल्यूशन फोटो क्लिक करण्यास मदत करेल. असा दावा केला जात आहे की, या 200 मेगापिक्सेल सेन्सरसह (Samsung 200MP Image Sensor) क्लिक केल्यावर कोणत्याही फोटोची बारीक डिटेलिंग पाहता येईल.


अॅपलने जागतिक बाजारात M2 चिप लॉन्च केली


अॅपलने जागतिक बाजारपेठेत आपली नवीन M2 चिप देखील लॉन्च केली आहे. M2 Pro आणि M2 Max M2 चिपमध्ये दोन चिपसेटसह येतात. Apple ने या चिपसेटसह 14 इंच आणि 16 इंच स्क्रीन आकाराचे Apple MacBook Pro लॅपटॉप सादर केले आहेत.


इतर बातम्या: 


Mahindra XUV e8: देशातील पहिली बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढील वर्षी होणार लॉन्च, जाणून घ्या कशी आहे महिंद्राची 'ही' जबरदस्त कार