Samsung Galaxy : सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G  हे दोन फोन भारतात लॉन्च  केले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 8GB RAM, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. 


Galaxy A14 5G तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये लाल, हिरवा आणि काळा असे तीन रंग आहेत.  Galaxy A14 5G 6.6 इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले स्क्रीनसह लॉन्च झाला आहे. फोन स्क्रीनसह 16 एम कलरसारखे फीचर्स देखील फोनमध्ये दिले आहेत. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1 एमएम आणि वजन 210 ग्रॅम आहे. Galaxy A14 5G मध्ये, 13MP सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या लेन्ससह 50MP ट्रिपल-लेन्स रिअर कॅमेरा आहे. 


तर दुसरीकडे Galaxy A23 5G तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. Galaxy A23 5G मध्ये मोठ्या लेन्ससह 50MP क्वॉर्ड रिअर कॅमेरा सेट-अप आहे. Galaxy A23 5G,  OIS ने सुसज्ज आहे. ज्यामुळे यूजर्सना शेक आणि ब्लरशिवाय चांगले फोटो आणि व्हिडीओ क्लिक करता येणार आहे. 


बॅटरी बॅकअप


Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G या दोन्हीमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीसह दोन दिवसांपर्यंतच्या पॉवरसह उपलब्ध आहेत. Galaxy A23 5G 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.  हा फोन अ‍ॅडॉप्टिव्ह पॉवर सेव्हिंग मोडसह सुसज्ज आहे.  


फोनची किंमत 


Galaxy A23 5G



  • रंग - हलका निळा, नारिंगी

  • 8GB + 128GB - 24,999 रुपये 

  • 6GB + 128GB - 22,999 रुपये


Galaxy A14 5G



  • रंग- गडद लाल, हलका हिरवा, काळा 

  • 8GB+128GB – 20,999 रुपये

  • 6GB+128GB – 18,999 रुपये  

  • 4GB + 64GB - 16,499 रुपये 


कोरोना काळात अनेक स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन होताना पाहायला मिळाली. अशात कोविडच्या निर्बंधांमुळे लॉन्च देखील ऑनलाईन झाले. मात्र, मागील काही महिन्यात अनेक स्मार्टफोन्सच्या ऑनलाईन विक्रीत घट बघायला मिळाली आहे. अशात, पुन्हा एकदा सॅमसंगसाठी ऑफलाईन ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने प्रीमियम फोन ऑफलाईन लॉन्च करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा वापरला जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Galaxy S23 : 12 GB रॅम आणि दमदार फिचर्ससह Samsung Galaxy S23 'या' दिवशी होणार लॉन्च; पाहा वैशिष्ट्य