मुंबई : जर तुम्ही सॅमसंग (SamSung) युजर्स आहात तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट (Google Assistant) सपोर्ट दिला जाणार नाही. रिपोर्टनुसार,  1 मार्च 2024 पासून सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये (Smart TV) गुगल असिस्टंट काम करणार नाही. असं का होणार आहे, याबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. दरम्यान गुगले त्यांच्या धोरणांमध्ये केलेल्या बदलामुळे सॅमसंगने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


सॅमसंगने जरी आता त्यांच्या सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये असलेलं गुगल असिस्टंट हे फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वच स्मार्ट टीव्हीमध्ये हे फिचर बंद होणार नाही आहे. सॅमसंगच्या काही ठराविकच स्मार्ट टीव्हीमध्ये हे फिचर काम करणार नाही. दरम्यान सॅमसंगच्या कोणत्या टीव्हीमध्ये हे फिचर काम करणार नाही, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


सॅमसंगच्या कोणत्या स्मार्ट टीव्हीमध्ये नाही चालणार गुगल असिस्टंट 



  • 2022 मॉडेल

  • 2021 मॉडेल

  • 2020 8K आणि 4K QLED टीव्ही

  • 2020 क्रिस्टल यूएचडी टीव्ही

  • 2020 लाईफस्टाईल टीव्ही (फ्रेम, सेरिफ, टेरेस आणि सेरो)


अवघ्या 4 वर्षांत बंद झाली ही सेवा


रिपोर्टनुसार, चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये सॅमसंगने आपल्या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यास सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या 4 वर्षांत ही ही सेवा बंद करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, गुगल पॉलिसीमध्ये बदल झाल्यामुळे सॅमसंगने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, गुगल असिस्टंट सपोर्ट बंद होण्यामागचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 


व्हॉइस असिस्टंट सपोर्ट म्हणजे काय?


गुगल असिस्टंट फीचर कोणत्याही कमांडला व्हॉइस सपोर्ट करते. म्हणजे स्मार्ट टीव्ही बोलून चालवता येतो. तसेच आवाज वाढवता आणि कमी केला जाऊ शकतो. याशिवाय कोणतेही ॲप व्हॉईस कमांडने उघडता येते. ही Google ची सेवा आहे. जी बहुतांश स्मार्ट टीव्हीमध्ये उपलब्ध करुन दिली जाते. 


 स्मार्ट टीव्हीची मागणी सध्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक ओटीटी माध्यमांचे देखील सब्सक्रिप्शन मिळते, त्यामुळे लोकं सध्या स्मार्ट टीव्हीला अधिक पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण सॅमसंगने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांना कोणत्या प्रमाणात फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Apple iPhone sale in India : भारतात दिवसागणिक वाढतेय आयफोनची मागणी, शेवटच्या तिमाहीत ॲपलने केली विक्रमी विक्री, सीईओ टीम कूक यांची माहिती