मुंबई : अॅपल (Apple) सध्या एआय फिचरवर काम करत असल्याचं अॅपलचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांनी म्हटलं. तसेच काही तज्ञांनी देखील अॅपल लवकरच त्यांचे एआय फिचर सुरु करणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. अॅपलमध्ये येणाऱ्या iOS अपडेटमध्ये हे एआय फिचर जोडले जाऊ शकते. नुकतच गुगल आणि सॅमसंगने त्यांचे एआय फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. युजर्सना Google Pixel 8 आणि Samsung Galaxy S24 मालिकेत अनेक AI फिचर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
गुगल आणि सॅमसंगने लॉन्च करुन दिलेल्या फिचरमुळे अॅपल या शर्यतीत कुठेतरी मागे पडत असल्याचं चित्र होतं. तसेच अॅपलने नुकतचं त्यांची आयफोन 15 ची सीरिज देखील लॉन्च केली आहे. पण त्यामध्येही एआय फिचर युजर्सना देण्यात आलेले नाही. पण आता आयफोन येणाऱ्या अपडेटमध्ये हे फिचर जोडणार असल्याचे संकेत अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिलेत. त्यामुळे लवकरच युजर्सना आयफोनमध्ये AI फिचर मिळणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अॅपल करतयं AI फिचरवर काम
या आठवड्यात अॅलपचा जो क्वार्टरली अर्निंग कॉल झाला, त्यामध्ये या फिचरविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये टीम कुक यांनी सांगितले की, सध्या जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर फीचरवर काम सुरु आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे फिचर आयफोन युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते, असं देखील टीम कुक यांनी म्हटलं. दरम्यान अॅपलकडून नरेटिव्ह AI फिचरविषयी माहिती देण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील अॅपलकडून AI फिचरविषयी माहिती देण्यात आली होती.
iOS 18 असणार सर्वात मोठं अपडेट
यापूर्वी मार्क गुरमन यांनी माहिती दिली होती की, iOS 18 Apple च्या iOS हिस्ट्रीमधील सर्वात मोठे अपडेट असू शकते. त्यामुळे अॅपलकडून देण्यात येणाऱ्या याच अपडेटमध्ये युजर्सना AI फिचर उपलब्ध होऊ शकतो. पण अद्याप याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु विश्लेषकांनुसार, आयफोनमध्ये सध्या कोणतेही नवीन इनोव्हेशन येत नाही आहे, त्यामुळे आयफोनच्या विक्रीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. इतर ब्रँडने आतापर्यंत त्यांचे फोल्डेबल फोन, फ्लिप फोन आणि AI फिचरसह अनेक फोन लॉन्च केले आहेत. पण अॅपलने अद्याप अशा कोणत्याही प्रकारचे फोन तयार केले नाहीत.
ही बातमी वाचा :
Nirmala Sitharaman : AI मुळे वाढणार बेरोजगारीचे प्रमाण? निर्मला सीतारामन म्हणतात...